गोवा सरकारचा ऐतिहासिक निर्णय; पुढल्या वर्षी पर्यटक वाहने होणार इलेक्ट्रीक

जानेवारी 2024 पासून राज्यातील रेंट-ए-कॅब आणि रेंट-अ-बाईक वाहने इलेक्ट्रिक असतील, असे मुख्यमंत्री म्हणाले.
CM Pramod Sawant
CM Pramod SawantCM Twitter

गोवा सरकारने ऐतिहासिक निर्णय घेतला असून, पुढील वर्षी राज्यातील सर्व पर्यटक वाहने इलेक्ट्रीक करणार असल्याचे मुख्यमंत्री प्रमोद सावंत यांनी म्हटले आहे. जानेवारी 2024 पासून राज्यातील रेंट-ए-कॅब आणि रेंट-अ-बाईक वाहने इलेक्ट्रिक असतील, असे मुख्यमंत्री बुधवारी म्हणाले.

पणजी येथे सुरू असलेल्या चौथ्या एनर्जी ट्रान्झिशन वर्किंग ग्रुपच्या बैठकीत NITI आयोगाने आयोजित केलेल्या साइड-इव्हेंटला मुख्यमंत्री संबोधित करत होते.

गोवा राज्यात ईव्हीला प्रोत्साहन देण्यासाठी मोठ्या सुधारणांचा प्रस्ताव आहे असे मुख्यमंत्री सावंत म्हणाले. साइड इव्हेंटसाठी भारताचे G20 शेर्पा अमिताभ कांत उपस्थित होते.

जानेवारी 2024 पासून सर्व नवीन पर्यटक वाहने, रेंट-ए-कॅब आणि रेंट-ए-बाईक ईव्ही बंधनकारक केल्या जातील, असे मुख्यमंत्र्यांनी सांगितले. एकाहून अधिक टुरिस्ट टॅक्सी, दुचाकी आणि कॅब घेतलेल्या परमिटधारकांना जून 2024 पर्यंत ताफ्यातील 30 टक्के EV असणे बंधनकारक असेल. असेही सावंत म्हणाले. गोव्यातील दरडोई वाहन मालकी राष्ट्रीय सरासरीच्या 4.5 पट आहे. अशी माहिती सावंत यांनी दिली.

CM Pramod Sawant
मुख्यमंत्री सावंतांनी उद्घाटन केले, तीन दिवसांत गांजे येथील पंप हाऊस वाहून गेले

जागतिक पर्यटनाचे केंद्र असल्याने, राज्याच्या 15 लाख लोकसंख्येच्या तुलनेत दरवर्षी 85 लाखांहून अधिक पर्यटक राज्याला भेट देतात. राज्यात मोठ्या संख्येने टॅक्सी, भाड्यावर दिली जाणारी वाहने आणि पर्यटकांच्या प्रवासासाठी वापरल्या जाणार्‍या बसेसमुळे राज्यातील कार्बन उत्सर्जनात मोठी वाढ झाली आहे. असे सावंत म्हणाले.

गोव्यात निर्माण होणाऱ्या एकूण कार्बन उत्सर्जनापैकी 40 टक्के कार्बन उत्सर्जन हे वाहनांमुळे होते. अशी माहिती नुकत्याच झालेल्या एका अभ्यासातून समोर आली आहे. दरम्यान, राज्यात खरेदी केलेल्या ईव्हीच्या टक्केवारीनुसार गोवा भारतात चौथ्या क्रमांकावर आहे, असे सावंत यांनी सांगितले.

Read Goa news in Marathi and Goa local news on Tourism, Business, Politics, Entertainment, Sports and Goa latest news in Marathi on Dainik Gomantak. Get Goa news live updates on the Dainik Gomantak Mobile app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Goa News on Dainik Gomantak
dainikgomantak.esakal.com