IRCTC Tour Package: तुम्ही पर्यटनाचा प्लॅन करत असाल तर IRCTC ने तुमच्यासाठी बेस्ट पॅकेज आणले आहे. इंडियन रेल्वे टूर कॉर्पोरेशन (IRCTC) वेळोवेळी फ्रेंडली टूर पॅकेजेस लॉन्च करत असते. यामध्येच आता रेल्वेने गोव्यासाठी आणलेल्या खास पॅकेजमध्ये तुम्हाला अहमदाबाद, गोवा आणि उज्जैनला एकत्र भेट देण्याची संधी मिळणार आहे. चला मग याविषयी सविस्तर जाणून घेऊया...
दरम्यान, हा प्रवास 9 रात्री 10 दिवसांचा असेल. या प्रवासात तुम्हाला केवळ शाकाहारी जेवण मिळेल.
उज्जैन- महाकालेश्वर, ओंकारेश्वर
अहमदाबाद- साबरमती आश्रम, अक्षरधाम मंदिर, अडालज स्टेप वेल, मोढेरा सूर्य मंदिर
एकता नगर- स्टॅच्यू ऑफ युनिटी
गोवा (Goa)- मंगेशी मंदिर, बॅसिलिक ऑफ बॉम जीझस, सी कॅथेड्रल, कोलवा बीच
हा प्रवास 30 जूनपासून सुरु होणार असून 9 जुलै 2024 पर्यंत चालणार आहे.
हे पॅकेज तिरुअनंतपुरम सेंट्रलच्या कोचुवेली स्थानकांपासून सुरु होईल.
कोचुवेली - कोल्लम - चेंगन्नूर - कोट्टायम - एर्नाकुलम टाउन - त्रिशूर - ओट्टापलम - पलक्कड जंक्शन - पोदानूर जंक्शन - इरोड जंक्शन - सेलम जंक्शन.
मंगळुरू जंक्शन - कन्नूर - कोझिकोड - शोरनूर जंक्शन - त्रिशूर - एर्नाकुलम टाउन, कोट्टायम - चेंगन्नूर - कोल्लम - कोचुवेली.
या पॅकेजमध्ये एकूण 700 लोक प्रवास करु शकतात. ज्यामध्ये एकूण 700 सीट्स आहेत. बजेट पॅकेजसाठी 400 सीट्स, इकॉनॉमी पॅकेजसाठी 150 सीट्स आणि स्टँडर्डसाठी 150 सीट्स असतील.
जर तुम्ही बजेट पॅकेज बुक केले तर तुम्हाला 19,000 रुपये खर्च करावे लागतील. तर एखादे मूल तुमच्यासोबत असेल तर तुम्हाला 17,890 रुपये द्यावे लागतील.
तुम्ही इकॉनॉमी पॅकेज बुक केल्यास तुम्हाला 20,970 रुपये खर्च करावे लागतील. तर एखादे मूल तुमच्यासोबत असेल तर तुम्हाला 19,660 रुपये द्यावे लागतील.
जर तुम्ही स्टँडर्ड पॅकेज बुक केले तर तुम्हाला 23,600 रुपये खर्च करावे लागतील. तर एखादे मूल तुमच्यासोबत असेल तर तुम्हाला 22,020 रुपये द्यावे लागतील.
प्रवाशांसाठी प्रवास विमा.
टूर गाइड सेवा
ट्रेनमध्ये सुरक्षा
आवश्यक सहाय्य देण्यासाठी IRCTC टूर मॅनेजर संपूर्ण टूरमध्ये प्रवास करेल.
लॉन्ड्री
मॉन्यूमेंट तिकीट शुल्क
9281495843
9281495845
पॅकेज सुरु होण्याच्या 15 दिवस आधी तुम्ही तिकीट रद्द केल्यास प्रति व्यक्ती 250 रुपये कट केले जातील.
प्रवास सुरु होण्याच्या 8 ते 14 दिवस आधी तुम्ही तिकीट रद्द केल्यास, तुम्हाला पॅकेजच्या खर्चातून 25 टक्के रिफंड मिळणार.
प्रवास सुरु होण्याच्या 4 ते 7 दिवस आधी तुम्ही तिकीट रद्द केल्यास तुम्हाला पॅकेजच्या खर्चाच्या केवळ 50 टक्के रक्कम मिळेल. तथापि, जर तुम्ही 4 दिवस अगोदर तिकीट बुक केले तर तुम्हाला कोणताही रिफंड मिळणार नाही.
प्रवासादरम्यान क्रॉस व्हेरिफिकेशनसाठी ओळखीचा पुरावा म्हणून ओळखपत्र (ड्रायव्हिंग लायसन्स, मतदार ओळखपत्र, आधार कार्ड (Aadhar Card), पॅन कार्ड) सोबत ठेवा. तिकीट आणि ओळखपत्राशिवाय प्रवासात सामील होणाऱ्या प्रवाशांना प्रवास करण्याची परवानगी दिली जाणार नाही.
दैनिक गोमंतकचे सदस्य व्हा
Read Goa news in Marathi and Goa local news on Tourism, Business, Politics, Entertainment, Sports and Goa latest news in Marathi on Dainik Gomantak. Get Goa news live updates on the Dainik Gomantak Mobile app for Android and IOS.