गुन्ह्यांबाबत सक्रिय रहा; पोलिस महासंचालक इंद्रदेव शुक्ला यांचे आवाहन

जनजागृती करा: पोलिस महासंचालक शुक्ला यांचे पोलिसांना आवाहन
 Director-General I.D. Shukla
Director-General I.D. ShuklaDainik Gomantak
Published on
Updated on

पणजी: महिलासंबंधित गुन्हे दाखल करण्यासाठी पोलिसांनी सक्रिय रहावे. गुन्ह्यांचे तपासकाम हे गुणवत्तेच्या आधारावर नोंदवले जावेत व लवकरात लवकर निकालात काढण्यात यावेत. पोलिस स्थानकाच्या क्षेत्रातील संशयास्पद व्यक्तींबाबतची वेळोवेळी चौकशी करून गुन्हे प्रकरणे टाळावीत. महिला व मुलांमध्ये मैत्रीचे नाते वाढवून गंभीर गुन्ह्यांबाबतची जनजागृती करण्याचे आवाहन सोमवारी पोलिस महासंचालक इंद्रदेव शुक्ला यांनी केले.

आल्तिनो - पणजी येथे महिला पोलिस ठाण्यातर्फे महिलांच्या सुरक्षेसंदर्भात तपासकाम प्रशिक्षणाची दोन दिवशीय कार्यशाळा पोलिस अधिकाऱ्यांसाठी आयोजित करण्यात आल्यानंतर महासंचालक शुक्ला बोलत होते.

 Director-General I.D. Shukla
IPS इंद्रदेव शुक्ला गोव्याचे नवे पोलिस महासंचालक

यावेळी त्यांच्यासोबत पोलिस अधीक्षक बोसेट सिल्वा होते. पोलिसांनी नेहमी दक्ष असण्याची गरज आहे.पोलिस ठाणे परिसरातील बीट पोलिसांनी संशयास्पद व्यक्ती तसेच महिला व मुलांच्या गुन्ह्यांशी संबंधित असलेल्या आरोपींची अधूनमधून चौकशी करायला हवी. अशा प्रकारच्या 95 टक्के प्रकरणांमध्ये आरोपी पीडितेला ओळखतात. त्यामुळे अशा गुन्ह्यांना आळा घालण्यासाठी पालकांनी, कुटुंबियांनी तसेच नातेवाईकांनी या प्रकरणांबाबत जनजागृती करण्याची गरज आहे. हे आरोपी काहीवेळा कुटुंबातील, मित्र किंवा शेजारी असतात. त्यामुळे जनजागृतीनेच असे गुन्हे कमी करू शकतो. विनयभंग व बलात्काराच्या महिलांनी दिलेल्या तक्रारी वेळ न दवडता नोंद करून त्याची चौकशी सुरू करा, असे मत शुक्ला यांनी व्यक्त केले.

पोलिस अधिकारी महिलांसंबंधित गुन्हे नोंदवून त्याचा तपासकाम करतात, न्यायालयात आरोपपत्रही दाखल करतात. पुरावे व साक्षीदार याच्या जोरावर आरोपींना शिक्षाही होते मात्र हे गुन्हे कमी होण्याऐवजी वाढतच आहेत. यासाठी पोलिसांनी सतर्क राहून अशा गुन्हेगारांची पार्श्‍वभूमी तसेच लोकांच्या संपर्कात राहून समाजकंटकांची माहिती मिळवण्याची गरज आहे. अनेकदा एकही गुन्हा नसलेली व्यक्तीच्या मनात महिलांबाबत चलबिचल होऊ शकते अशांना वेळीच आळा घालण्यासाठी शोधून काढण्याची व त्यांच्यावर नजर ठेवायला पाहिजे

 Director-General I.D. Shukla
आतापर्यंत गोव्यात 9001 टॅक्सींना डिजीटल मीटर

राज्याला गुन्हेगारमुक्त करण्याचे ध्येय

पोलिसांबरोबर पालकांची आपल्या पाल्याच्या सुरक्षिततेची जबाबदारी घ्यायला हवी. महिला व मुले कशी सुरक्षित राहू शकतील यावर पोलिसांनी विचार करायला हवा. नागरिकांनी पोलिसांना सहकार्य करण्यास व माहिती देण्यास पुढे यावे तरच पोलिस राज्यात सुरक्षितता ठेवण्यास यशस्वी होऊ शकतील. गोवा राज्य गुन्हेगारमुक्त तसेच महिलांसाठी सुरक्षित ठेवण्याचे पोलिसांचे ध्येय आहे, असे शुक्ला म्हणाले.

Read Goa news in Marathi and Goa local news on Tourism, Business, Politics, Entertainment, Sports and Goa latest news in Marathi on Dainik Gomantak. Get Goa news live updates on the Dainik Gomantak Mobile app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
var bottom_sticky_ad = googletag .sizeMapping() .addSize([1000, 0], [[728, 90]]) .addSize( [0, 0], [ [320, 50], [300, 50], [320, 100] ] )         .build()
Goa News on Dainik Gomantak
dainikgomantak.esakal.com