आतापर्यंत गोव्यात 9001 टॅक्सींना डिजीटल मीटर

अडीच महिन्यांत 125 टॅक्सींना दंड
Taxi
Taxi Dainik Gomantak
Published on
Updated on

पणजी: राज्यातील कोरोना महामारीचे सर्व निर्बंध उठवण्यात आल्याने पर्यटन व्यवसाय सुरळीत सुरू झाला आहे. आतापर्यंत राज्यातील 9001 टॅक्सींना डिजीटल मीटर बसवण्यात आले आहेत, तर नोंदणी केलेल्या 67 टॅक्सींना ते बसविण्याचे काम सुरू आहे. परवान्याची मुदत संपल्यानंतर डिजीटल मीटरविना व्यवसाय करणाऱ्या 125 टॅक्सीचालकांविरुद्ध दंडात्मक कारवाई करण्यात आली आहे.

गोवा खंडपीठाने राज्यातील सर्व टॅक्सींना डिजीटल मीटरची सक्ती केली होती. त्याला विरोध करून सादर केलेल्या याचिका खंडपीठाने फेटाळल्या होत्या व त्यावर निवाडा दिला होता.

Taxi
पक्षाच्या कोअर कमिटीचा पाठिंबा असल्याने प्रमोद सावंतांच्या निवडीला अनुकूलता

वाहतूक खात्यानेही कठोर भूमिका घेत डिजीटल मीटर बसविलेल्यांनाच वाहतूक व्यवसाय सुरू ठेवण्यास परवानगी देत इतरांविरुद्ध कारवाई सुरू केली होती. न्यायालयाच्या आदेशाचे पालन न करताच टॅक्सीचालक डिजीटल मीटरविना व्यवसाय करत असल्यासंदर्भात अवमान याचिका टुर्स अँड टुरिझम एसोसिएशन ऑफ गोवातर्फे (टीटीएजी) सादर झाली होती. त्यावरील सुनावणीवेळी गोवा खंडपीठाने देखरेख ठेवून स्थितीजन्य अहवाल वारंवार सादर करण्याचे निर्देश देण्यात आले आहेत.

Taxi
Goa Weather Updates: राजधानी पणजीत विक्रमी तापमानाची नोंद

ही सुनावणी आता खंडपीठाच्या निर्देशानुसार वाहतूक संचालकांनी डिजीटल मीटर तसेच केलेली कारवाई यासंदर्भातचा अहवाल सादर केला. यापूर्वी हा अहवाल 15 नोव्हेंबर 2021, 29 नोव्हेंबर 2021, 13 डिसेंबर 2021 व 12 जानेवारी 2022 रोजी सादर केला गेला होता. त्यानंतर आज नव्याने अहवाल सादर केला आहे. आज 14 मार्च 2022 रोजी सादर केलेल्या अहवालात गेल्या अडीच महिन्यात डिजीटल मीटर बसवलेल्यांची संख्या 9001 वर पोहचली आहे, तर 71 जणांनी मीटरसाठी रोझमाल्टा (आरएपीएल) या कंत्राटदाराकडे नोंदणी केली आहे.

Read Goa news in Marathi and Goa local news on Tourism, Business, Politics, Entertainment, Sports and Goa latest news in Marathi on Dainik Gomantak. Get Goa news live updates on the Dainik Gomantak Mobile app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Goa News on Dainik Gomantak
dainikgomantak.esakal.com