IPL Betting Racket: कोलव्यात 'आयपीएल' बेटिंग रॅकेटचा पर्दाफाश! 3.10 लाखांच्या साहित्यासह 4 सट्टेबाज पोलिसांच्या जाळ्यात

Goa IPL Betting Racket: कोलवा पोलिसांनी ‘आयपीएल’ बेटिंग रॅकेटचा पर्दाफाश करताना चौघांना गजाआड केले. वानेली-कोलवा येथील एका व्हिलामध्ये हे रॅकेट चालत होते.
IPL Betting Racket
IPL Betting RacketDainik Gomantak
Published on
Updated on

मडगाव: कोलवा पोलिसांनी ‘आयपीएल’ बेटिंग रॅकेटचा पर्दाफाश करताना चौघांना गजाआड केले. वानेली-कोलवा येथील एका व्हिलामध्ये हे रॅकेट चालत होते. संशयितांकडून दोन लॅपटॉप व सहा मोबाईल मिळून एकूण तीन लाख दहा हजार रुपयांचे साहित्य जप्त करण्यात आले.

प्रफुल्ल ऊर्फ जिगर ठक्कर (२८), धवल भाई (२४) व जय कमलेश पटेल (३१) या सर्व गुजरात येथील तर विशाल चावला (३१) या हरियाणा येथील संशयितांच्या पोलिसांनी मुसक्या आवळल्या. काल शनिवारी (ता. २५) रात्री उशिरा पोलिसांनी ही कारवाई केली.

IPL Betting Racket
Goa Unseasonal Rain: वाळपईला अवकाळी पावसासह चक्रीवादळाचा तडाखा, झाडांची मोठ्या प्रमाणात पडझड; घरांवर झाडे कोसळून लाखोंचे नुकसान

जुगार प्रतिबंधात्मक कायद्याखाली गुन्हा दाखल करून संशयितांना अटक केल्यानंतर न्यायालयात उभे केले असता त्‍यांची जामिनावर सुटका करण्‍यात आली.

IPL Betting Racket
Goa 11th Admission: अकरावीसाठी आजपासून प्रवेश, शिक्षण विभाग सज्ज; वाणिज्य, विज्ञान शाखेत चुरस अपेक्षित

पोलिस निरीक्षक विक्रम नाईक यांनी सापळा रचून ही कारवाई केली. पोलिस अधिक्षक संतोष देसाई व सिद्धांत शिरोडकर यांच्या मार्गदर्शनाखाली पुढील तपास सुरू आहे.

दैनिक गोमंतकचे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Goa news in Marathi and Goa local news on Tourism, Business, Politics, Entertainment, Sports and Goa latest news in Marathi on Dainik Gomantak. Get Goa news live updates on the Dainik Gomantak Mobile app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Goa News in Marathi - Dainik Gomantak
dainikgomantak.esakal.com