IOCL Recruitment 2022: गोव्यातील 12वी आणि ITIउत्तीर्णांसाठी मोठी संधी

गुजरात, महाराष्ट्र, मध्य प्रदेश, छत्तीसगड, गोवा आणि दादरा आणि नगर हवेली येथे 500 हून अधिक पदांची भरती
IOCL Recruitment 2022
IOCL Recruitment 2022Dainik Gomantak
Published on
Updated on

इंडियन ऑइल कॉर्पोरेशन लिमिटेड (IOCL) ने अप्रेंटिस (Apprentice) भर्ती 2022 साठी अर्ज मागविले केले आहेत. पश्चिम भारतातील राज्ये आणि केंद्रशासित प्रदेशांमध्ये टेक्निकल आणि नॉन टेक्निकल पदे भरली जाणार आहे. इच्छुक आणि पात्र उमेदवार IOCL च्या अधिकृत वेबसाइट iocl.com वर जाऊन ऑनलाइन अर्ज करू शकतात. पात्र उमेदवारांची लेखी चाचणीद्वारे निवड केली जाईल. (IOCL Recruitment 2022: Great opportunity for 12th and ITI pass Students in Goa)

IOCL ने गुजरात, महाराष्ट्र, मध्य प्रदेश, छत्तीसगड, गोवा (Goa), दादरा आणि नगर हवेली येथे 500 हून अधिक अप्रेटिस पदासाठी ही भरती मोहीम आयोजित केली आहे. पात्र उमेदवार 15 फेब्रुवारी 2022 पर्यंत ऑनलाइन पद्धतीने अर्ज करू शकतात. शिकाऊ प्रशिक्षणाचा कालावधी एक वर्षाचा असेल. उमेदवारांना रिजनल डायरेक्टरेट ऑफ अप्रेंटिसशिप (RDAT) कडे ट्रेड अप्रेंटिस म्हणून ऑनलाइन नोंदणी करण्याचा सल्ला दिला जातो किंवा बोर्ड ऑफ अप्रेंटिसशिप ट्रेनिंग (BOAT) मध्ये तंत्रज्ञ शिकाऊ म्हणून ऑनलाइन अर्ज करावा असे अधिकृत सुचनेत देण्यात आले आहे. अधिक तपशीलांसाठी iocl.comवर जावून अधिक माहिती मिळवू शकता.

रिक्त पदांचा तपशील

गुजरात – 121 पदे

महाराष्ट्र – 322 पदे

मध्य प्रदेश – 80 पदे

छत्तीसगड – 35 पदे

गोवा – 08पदे

दादरा आणि नगर हवेली – 04 पदे

एकूण रिक्त पदांची संख्या – 570

IOCL Recruitment 2022
Indian Railway Recruitment 2022: परीक्षेशिवाय मिळवा नोकरी आणि 43000 पेक्षा जास्त पगार

शैक्षणिक पात्रता

नियामक मंडळाची 12वी (इंटरमीडिएट) परीक्षा उत्तीर्ण आणि संबंधित ट्रेडमध्ये आयटीआय डिप्लोमा असलेले प्रमाणपत्र असलेल उमेदवार अर्ज करू शकतात. बीई, बीटेक, एमसीए, एलएलबी आणि इतर उच्च शैक्षणिक पदवी असलेल्या उमेदवारांचे अर्ज स्वीकारले जाणार नाहीत, असे जाहीर केलेल्या अधिसूचनेत स्पष्टपणे म्हटले आहे.

वयोमर्यादा

पात्र अर्जदारांचे वय 31 जानेवारी 2022 रोजी किमान 18 वर्षे आणि कमाल 24 वर्षे असावे. राखीव प्रवर्गातील उमेदवारांना सरकारी नियमांनुसार उच्च वयोमर्यादेत सवलत दिली जाणार आहे. ट्रेड आणि टेक्निशियन शिकाऊ उमेदवारांना वाहतूक आणि विविध खर्चासाठी 2500 रुपयांच्या अतिरिक्त रकमेसह प्रशिक्षणार्थी नियमांनुसार एकत्रित स्टायपेंड दिला जाणार आहे.

IOCL Recruitment 2022
UPSC Recruitment 2022: विविध विभागांमध्ये भरतीसाठी आजच अर्ज करा

निवड प्रक्रिया

अर्जदारांची 90 मिनिटांची लेखी चाचणी होणार. कागदपत्र पडताळणी आणि इतर पात्रता निकषांची पूर्तता या आधारावर उमेदवारांची निवड केली जाईल. लेखी परीक्षा ऑनलाइन पद्धतीने होईल ज्यामध्ये 100 वस्तुनिष्ठ प्रकारचे बहुपर्यायी प्रश्न (MCQ) विचारले जातील.

Read Goa news in Marathi and Goa local news on Tourism, Business, Politics, Entertainment, Sports and Goa latest news in Marathi on Dainik Gomantak. Get Goa news live updates on the Dainik Gomantak Mobile app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
var bottom_sticky_ad = googletag .sizeMapping() .addSize([1000, 0], [[728, 90]]) .addSize( [0, 0], [ [320, 50], [300, 50], [320, 100] ] )         .build()
Goa News on Dainik Gomantak
dainikgomantak.esakal.com