GWPL: दहशतवादाला भीक न घालता 'ती'ने जपले क्रिकेट प्रेम; जम्मू-काश्मीरच्या लेकीची गोव्यात शतकी खेळी

यावर्षी महिला प्रीमियर लीगसाठी दिल्ली कॅपिटल्सने करारबद्ध केलेल्या जसियाने पर्वरीत लौकिक सार्थ ठरविला.
Goa Women’s Premier League
Goa Women’s Premier LeagueDainik Gomantak
Published on
Updated on

Goa Women’s Premier League: जम्मू-काश्मीरमधील शोफियाँ जिल्ह्यातील ब्रारी पोरा गावातील जसिया अख्तर हिने तेथील दहशतवादास भीक न घालता क्रिकेट प्रेम जपले, ती खेळत राहिली. त्यासाठी तिला पंजाब, राजस्थानकडून खेळण्याचा पर्याय निवडावा लागला. मंगळवारी पर्वरी येथील मैदानावर या 34 वर्षीय महिला फलंदाजांचा तुफानी शतकी झंझावात अनुभवण्यास मिळाला.

जसिया अख्तरने अवघ्या 72 धावांत 120 धावा करताना 16 चौकार व 4 षटकारांची आतषबाजी केली. यासह गोवा महिला प्रीमियर लीग क्रिकेट स्पर्धेत शतक झकवणारी पहिली महिला क्रिकेटपटू हा मानही जसियाला मिळाला. यावर्षी महिला प्रीमियर लीगसाठी दिल्ली कॅपिटल्सने करारबद्ध केलेल्या जसियाने पर्वरीत लौकिक सार्थ ठरविला.

जसियाच्या धमाकेदार फलंदाजीमुळे सेलेस्ते सूपरवूमन्स संघाने व्हेंचर इलेव्हनला 31 धावांनी हरविले. जसियाने विनवी गुरव हिच्यासमवेत दुसऱ्या विकेटसाठी 149 धावांची भागीदारी केली. सेलेस्ते संघाचा हा सलग दुसरा विजय ठरला. अगोदरच्या लढतीत त्यांनी पणजी जिमखान्यास हरविले होते. व्हेंचर इलेव्हनचा हा लागोपाठ दुसरा पराभव आहे.

संक्षिप्त धावफलक

सेलेस्ते सूपरवूमन्स: 20 षटकांत 2 बाद 177 (जसिया अख्तर 120, विनवी गुरव नाबाद 31, प्रीती यादव नाबाद 18) वि. वि. व्हेंचर इलेव्हन: 20 षटकांत 5 बाद 146 (तमन्ना निगम नाबाद 70, तरन्नूम पठाण 27, दीक्षा गावडे 18, पूजा निषाद 2-28).

Read Goa news in Marathi and Goa local news on Tourism, Business, Politics, Entertainment, Sports and Goa latest news in Marathi on Dainik Gomantak. Get Goa news live updates on the Dainik Gomantak Mobile app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
var bottom_sticky_ad = googletag .sizeMapping() .addSize([1000, 0], [[728, 90]]) .addSize( [0, 0], [ [320, 50], [300, 50], [320, 100] ] )         .build()
Goa News on Dainik Gomantak
dainikgomantak.esakal.com