Goa Crime: बायणा हनुमान मंदिर पुजारी हल्लाप्रकरणी तपास सुरू

Goa: हनुमान मंदिराच्या बाजूस असलेले अतिक्रमण मुरगाव पोलिसांनी हटविले आहे. तसेच संपूर्ण तालुक्यात पोलिसांनी रात्रीची गस्त वाढविली आहेत.
Hanuman Temple
Hanuman Temple Dainik Gomantak
Published on
Updated on

Goa: बायणा समुद्र किनाऱ्यावरील संकटमोचन हनुमान मंदिरातील मुख्य पुरोहित व मंदिराची देखभाल करणाऱ्यांवर हल्लाप्रकरणी पोलिस अधिक तपास करीत आहेत.

याप्रकरणी पुरोहित दत्तप्रसाद भट व इतरांच्या तक्रारीवरून आणखी हल्लेखोरांना अटक होणार असल्याची माहिती मुरगाव तालुक्याचे पोलिस उपअधीक्षक शेख सलीम यांनी दिली आहे.

याप्रकरणी शेख सलीम अधिक तपास करीत आहेत. हनुमान मंदिराच्या बाजूस असलेले अतिक्रमण मुरगाव पोलिसांनी हटविले आहे. संपूर्ण तालुक्यात पोलिसांनी रात्रीची गस्त वाढविली असल्याची माहिती त्यांनी दिली.

Hanuman Temple
Mallikarjun Temple Goa: श्री मल्लिकार्जुन देवस्थानात आज अवतार व कौलप्रसाद

बायणा किनाऱ्यावर गुंडगिरीने पुन्हा डोके वर काढू नये, तेथे येणाऱ्या पर्यटक तसेच स्थानिक नागरिकांना कोणताही त्रास होऊ नये, यासाठी तेथे पोलीस चौकी उघडण्यात येणार आहे. या पार्श्वभूमीवर शेख यांनी प्रयत्न चालविले आहेत.

गेल्या दोन दिवसांपासून ते बायणा किनाऱ्याला भेट देऊन तेथील परिस्थितीची पाहणी करीत आहेत. त्यामुळे येणाऱ्या आठ-दहा दिवसांत तेथे नवीन पोलिस चौकी पाहायला मिळणार आहे.

दैनिक गोमंतकचे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Goa news in Marathi and Goa local news on Tourism, Business, Politics, Entertainment, Sports and Goa latest news in Marathi on Dainik Gomantak. Get Goa news live updates on the Dainik Gomantak Mobile app for Android and IOS.

Related Stories

Goa Spa Owner Rape Case
Noida Businessman Death Goa
Pernem Nurse Stabbed
Vagator Beach Hostel Drug Racket
Goa News in Marathi - Dainik Gomantak
dainikgomantak.esakal.com