होंडा तलाठी कार्यालयातील इंटरनेट सेवा ठप्प

होंडा तलाठी कार्यालयातील इंटरनेट सेवा चार दिवसांपासून बंद
Internet Service
Internet ServiceDainik Gomantak
Published on
Updated on

पिसुर्ले: पर्ये मतदार संघात येणाऱ्या होंडा पंचायत क्षेत्रातील तलाठी कार्यालयातील इंटरनेट सेवा गेल्या चार दिवसांपासून बंद असल्याने नागरिकांच्या कामाचा खोळंबा झाला आहे. सद्या शाळां विद्यालये सुरू झाली असल्याने विद्यार्थ्यांना रहिवासी तसेच जात प्रमाणपत्र गरजेचे आहेत, परंतू सदर इंटरनेट सेवा बंद असल्याने त्यांना तलाठी कार्यालयात त्यांना हेलपाटे मारावे लागत आहे.

(Internet service at Honda Talathi office jammed)

Internet Service
संपावर असलेल्या अंगणवाडी सेविकांच्या प्रश्नावर आज तोडगा काढणार; CM सावंत

राज्य सरकारने सर्व क्षेत्रात ऑनलाईन सेवा उपलब्ध करुन देताना मामलेदार तसेच उपजिल्हाधिकारी कार्यालया तर्फे देण्यात येणारे सर्व प्रकारची प्रमाणपत्र किंवा दाखले मिळविण्यासाठी तलाठी कार्यालयातून प्रक्रिया करावी लागते. या मध्ये रहिवासी, जात, उत्पादन या सारख्या महत्वाच्या प्रमाणपत्राचा समावेश आहे.

सद्या शाळां, विद्यालये सुरू झाली असल्याने विद्यार्थ्यांना प्रवेश किंवा शिष्यवृत्ती योजना मिळवण्यासाठी सदर प्रमाणपत्रे ही अत्यंत गरजेचे असते, त्यामुळे सदर तलाठी कार्यालयातील इंटरनेट सेवाच चार पाच दिवसांपासून बंद असल्याने सर्व कामे खोळंबली आहेत.

या प्रकरणी संबंधित खात्याच्या वरिष्ठ अधिकाऱ्यांनी लक्ष घालून सदर तलाठी कार्यालयातील इंटरनेट सेवा पूर्वरत सुरू करावी अशी मागणी नागरिकांनी केली आहे.

दैनिक गोमंतकचे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Goa news in Marathi and Goa local news on Tourism, Business, Politics, Entertainment, Sports and Goa latest news in Marathi on Dainik Gomantak. Get Goa news live updates on the Dainik Gomantak Mobile app for Android and IOS.

Related Stories

Goa Forward Suspends Alliance Talks
Swiggy Rs 93 Lakh Theft
Jaigad Shipbuilding Project
Heavy Rain, Yellow Alert In Goa
Goa News in Marathi - Dainik Gomantak
dainikgomantak.esakal.com