
Leander Paes Tennis Academy Announcement Goa
मडगाव: मूळ गोमंतकीय वंशाचा असलेला भारताचा महान टेनिसपटू लिएंडर पेस याने गोव्यात क्रीडा अकादमी सुरु करण्याचा आपला मानस असल्याचे सांगितले.
मडगावच्या बीपीएस क्लबने शुक्रवारी उभरत्या टेनिस खेळाडूंचा लिएंडर पेस याच्याबरोबर संवादाचा कार्यक्रम आयोजित केला हाेता. मडगावचे आमदार दिगंबर कामत हेही यावेळी उपस्थित होते. बीपीएस क्लबचे अध्यक्ष योगिराज कामत यांनी सर्वांचे स्वागत केले.
पेस म्हणाला, की गोव्यातून चांगले खेळाडू पुढे यायला पाहिजेत. जे जागतिक दर्जाचे खेळाडू असतील आणि देशासाठी ऑलिंपिक पदके आणण्याची धमक त्यांच्यात असेल. या खेळाडूंना तयार करण्यासाठी अकादमी प्रयत्न करणार आहे. या अकादमीत टेनिस खेळावर अधिक भर दिला जाईल.
लिएंडर पेस याला आंतरराष्ट्रीय टेनिस ‘हाॅल ऑफ फेम’ पदक देऊन गाैरवित करण्यात आले. हे पदक मी माझी मूळ भूमी असलेल्या गोव्याला आणि गोवेकरांना समर्पित करतो, असेही तो म्हणाला. खेळात जर पुढे यायचे असेल तर परिश्रम केल्याशिवाय पर्याय नाही.
गोव्यात जरी माझा जन्म झाला नाही तरी मला गोवा आवडतो. गोव्यात येणे हे माझ्यासाठी एक आनंदाची बाब असतेे. गोव्याने मला नेहमीच उर्जा दिली आहे. त्यामुळे गोवा आणि गोवेकरांचा मी ऋणी आहे असे त्याने सांगितले.
१९९६ साली अटलांटा ऑलिंपिकमध्ये पुरुष टेनिस एकेरीत ब्राँझपदक जिंकलेला ५१ वर्षी लिअँडर दुहेरी टेनिसमधील सर्वोत्तम खेळाडूंत गणला जातो. दुहेरीत त्याने चारही प्रमुख ग्रँडस्लॅम जिंकण्याचा पराक्रम साधला आहे.
दैनिक गोमंतकचे सदस्य व्हा
शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.
Read Goa news in Marathi and Goa local news on Tourism, Business, Politics, Entertainment, Sports and Goa latest news in Marathi on Dainik Gomantak. Get Goa news live updates on the Dainik Gomantak Mobile app for Android and IOS.