Wheelchair Tennis Tournament: गोव्यातील दिव्यांग खेळाडूंसाठी चॅलेंजर व्हीलचेअर टेनिस, बीपीएस क्लबतर्फे आयोजन

Wheelchair Tennis Challenger tournament: पॅरा खेळाडूंचे सराव शिबिर नुकतेच मडगाव येथे झाले. खेळाडूंना सुरेश कदम यांचे मार्गदर्शन लाभले.
Wheelchair Tennis Challenger tournament
Wheelchair Tennis Challenger tournament Margao Goa Dainik Gomantak
Published on
Updated on

Wheelchair Tennis Challenger tournament Margao Goa

पणजी: मडगाव येथील बीपीएस स्पोर्टस क्लबतर्फे दिव्यांग टेनिसपटूंसाठी २२ फेब्रुवारीपासून व्हीलचेअर टेनिस चॅलेंजर स्पर्धा घेण्यात येणार आहे. स्पर्धेसाठी नोंदणी प्रक्रिया लवकरच सुरू होणार असून पॅरा खेळाडूंचे सराव शिबिर नुकतेच मडगाव येथे झाले. खेळाडूंना सुरेश कदम यांचे मार्गदर्शन लाभले.

‘‘आम्ही टेनिस खेळण्यासाठी आणि आगामी बीपीएस व्हीलचेअर टेनिस चॅलेंजर स्पर्धेत भाग घेण्यासाठी खूप उत्सुक आहोत. टेनिस प्रशिक्षण सत्र आयोजित केल्याबद्दल मी बीपीएसस्पोर्टस क्लबचा आभारी आहे. व्हीलचेअर टेनिस खेळण्यासाठी गोव्यातील कित्येक जण इच्छुक आहे.

आता आम्हाला टेनिस खेळण्याची प्रेरणा वाटत असून भविष्यात राज्यस्तरीय स्पर्धा झाल्या तर त्यामध्ये आम्ही नक्कीच भाग घेऊ आणि जिंकू,’’ असा आशावाद वास्को येथील मोझेस रॉड्रिग्ज याने व्यक्त केला.

Wheelchair Tennis Challenger tournament
Tennis Ball Cricket Tournament: ज्युनिअर टेनिस बॉल स्पर्धेत गोवा उपविजेता! उत्तर प्रदेशकडून पराभव; महिला संघ तिसऱ्या स्थानी

मोझेस पॅरा ॲथलीट असून यापूर्वी इतर खेळात छाप पाडली आहे. त्याने दोन वर्षांपूर्वी राज्यस्तरीय पॅरा टेबल टेनिस स्पर्धेत पहिला क्रमांक पटकावला होता. शिवाय २०२३-२४ मधील राज्यस्तरीय पॅरा ॲथलेटिक्स स्पर्धेत थाळीफेकीत रौप्य, तर भालाफेकीत ब्राँझपदक जिंकले होते.

आणखी व्हीलचेअर खेळाडू वन खात्याचे अधिकारी विशांत नागवेकर यापूर्वी व्हीलचेअरवरून गोव्यात झालेल्या आंतरराष्ट्रीय पर्पल फेस्टमध्ये क्रिकेट, बास्केटबॉल, टेबल टेनिस, बॅडमिंटन खेळलेला आहेत.

Wheelchair Tennis Challenger tournament
UTT Table Tennis Tournament: गोव्याच्या 'चंदन'ची सुवर्णझेप! यूटीटी राष्ट्रीय टेबल टेनिस स्पर्धेत अभिमानास्पद कामगिरी

बीपीएस स्पोर्टस क्लबचे अध्यक्ष योगीराज कामत यांनी व्हीलचेअर टेनिस स्पर्धा सर्वसमावेशकतेला प्रोत्साहन देणारी असल्याचे नमूद केले. राज्यातील व्हीलचेअर टेनिसपटू एकदिवस गौरवास्पद कामगिरी नोंदवतील असा विश्वास विक्रम वेर्लेकर यांनी व्यक्त केला. स्पर्धेला बाले रिसोर्टसचे अश्विन चंडिओक यांचे पाठबळ लाभत आहे.

दैनिक गोमंतकचे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Goa news in Marathi and Goa local news on Tourism, Business, Politics, Entertainment, Sports and Goa latest news in Marathi on Dainik Gomantak. Get Goa news live updates on the Dainik Gomantak Mobile app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Goa News on Dainik Gomantak
dainikgomantak.esakal.com