आंतरराष्ट्रीय जलतरणपटू आयर्नचा गोव्यातील समुद्रात विश्वविक्रम; आता ‘दुबई’ लक्ष्य

‘ओपन सी वॉटर’ मध्ये उल्लेखनिय कामगिरी
Aryan Dadiala
Aryan DadialaDainik Gomantak

Aryan Dadiala in Open Sea Water: गोव्यातील समुद्रात सलगपणे पोहण्याचा विश्वविक्रम केल्यानंतर आता दुबईतील समुद्रात पोहण्याचे लक्ष मनी जपले आहे.

नोव्हेंबरमध्ये गोव्यातील तीन विक्रम नोंदवल्यानंतर आता ‘दुबई’, पोलंड, इटली आणि स्वीडनच्या समुद्रात पोहण्याचे नियोजन असल्याचे मुंबईतील आंतरराष्ट्रीय जलतरणपटू आर्यन सुरजीत दाडीयाला याने सांगितले.

यशस्वी मोहिमेनंतर त्याने पत्रकार परिषदेत ही माहिती दिली. यावेळी आयर्नचे प्रशिक्षक राहूल चिपळूणकर, सुबोध सुळे, वडिल सुरजीत दाडीयाला उपस्थित होते.

आयर्न म्हणाला, की गोव्यात ज्यावेळी मी पोहण्याचा विश्‍वविक्रम केला त्यावेळी हवामानात सातत्याने बदल होत होते. या सर्व अडथळ्यांवर मात करीत मी तीन विक्रम नोंदवले. सर्वात वेगवान युवा जलतरणपटू असल्याचा मान मिळवला याचे मला खूप समाधान आहे.

Aryan Dadiala
Arjun Tendulkar: विजय हजारे ट्रॉफी स्पर्धेत अर्जुन तेंडूलकरमुळे गोव्याचा पराभव; कर्णधाराने बॉलच काढून घेतला...

राहूल चिपळूणकर यांनी सांगितले की, गोवा जलतरण संघटना, तसेच क्रीडा खात्याद्वारे आम्हाला चांगले सहकार्य मिळाले. त्यामुळे आयर्न गोव्यात विक्रम नोंदवू शकले. सुळे यांनी गोव्यातील समुद्र लाटा आणि पोहताना आलेले अडथळे यावर भाष्य केले.

राष्ट्रीय स्पर्धांत सहभाग व्हावा
ओपन वॉटर स्विमिंग या खेळाचा समावेश ऑलिम्पिक स्पर्धेत आहे. मात्र राष्ट्रीय क्रीडा स्पर्धांत या स्पर्धेचा समावेश नाही. गोव्यात नुकताच झालेल्या स्पर्धेतही ही स्पर्धा नव्हती. ओपन वॉटर स्विमिंंग स्पर्धेचाही राष्ट्रीय स्पर्धेत समावेश व्हायला हवा.

यासाठी राज्य आणि केंद्र सरकारने खास पुढाकार घेण्याची गरज आहे, असे मत सुरजित डाडीयाल यांनी व्यक्त केले. देशात ओपन वॉटर स्विमिंग या प्रकारातील खेळाडूंची संख्या वाढत आहे. या खेळाडूंना प्रोत्साहन मिळण्यासाठी सर्वांनी पुढे यायला हवे, असेही ते म्हणाले.

32 किमी अंतर साडेपाच तासांत
गोव्यातील शापोरा ते पणजी जेटी हे 32 किमीचे अंतर 5 तास 36 मिनिट आणि 40 सेकंदात पूर्ण करण्याचा विक्रम आर्यन याने नोंदवला आहे. एवढे अंतर सर्वात वेगाने कापणारा तो आर्यन पहिला युवा जलतरणपटू ठरला आहे. या मोहीमेत त्याने ‘से नो ड्रग्स’ चा संदेश दिला.

या मार्गावर पोहताना आर्यनला अनेक अडथळ्यांचा सामना करावा लागला. मोठ्या लाटा आणि जेली फिशमुळे हे अंतर कापणे आव्हानात्मक होते, असे आर्यनने सांगितले.

Aryan Dadiala
Goa Government Hotels: स्वस्तात गोवा ट्रिप करायचीय? मग 'या' सरकारी हॉटेल्समध्ये करा बुकिंग

122 पदके आणि 3 आंतराष्ट्रीय स्पर्धा
आयर्नने आतापर्यंत 122 पदके मिळवली आहे. त्याने आतापर्यंत ३ आंतरराष्ट्रीय स्पर्धेत भाग घेतला असून त्यात उल्लेखनिय कामगिरी केली आहे. आतापर्यंत सहा विक्रम नोंदवले आहेत. ज्यात गोव्यातील चार विक्रमांचा समावेश आहे.

गोव्यात 11 नोव्हेंबर रोजी त्याने केरी ते आश्वे 20 नोव्हेंबर रोजी आश्वे ते हणजूण आणि 23 नोव्हेंबर रोजी हणजूण बीच ते आग्वाद बीच असे अंतर कापले. या हे तीनही ठिकाणी पोहताना त्याने सर्वात वेगवान जलतरणपटू बनण्याचा मान मिळवला.

Read Goa news in Marathi and Goa local news on Tourism, Business, Politics, Entertainment, Sports and Goa latest news in Marathi on Dainik Gomantak. Get Goa news live updates on the Dainik Gomantak Mobile app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Dainik Gomantak | दैनिक गोमन्तक
dainikgomantak.esakal.com