Arjun Tendulkar: विजय हजारे ट्रॉफी स्पर्धेत अर्जुन तेंडूलकरमुळे गोव्याचा पराभव; कर्णधाराने बॉलच काढून घेतला...

बडोद्याने हा सामना 4 विकेटने जिंकला
Arjun Tendulkar
Arjun TendulkarDainik Gomantak
Published on
Updated on

Arjun Tendulkar in Vijay Hazare Trophy: मास्टर ब्लास्टर सचिन तेंडुलकरचा पुत्र अर्जून विजय हजारे ट्रॉफी स्पर्धेत गोवा संघाकडून खेळत आहे. दरम्यान, बडोद्या विरूद्धच्या सामन्यात अर्जून तेंडुलकरमुळे गोव्याला लाजिरवाण्या पराभवाला सामोरे जावे लागले.

त्याच्या विरोधात बडोद्याच्या संघानी खूप धावा केल्या. त्यामुळे गोव्याच्या संघाच्या कर्णधाराने नंतर अर्जुनला त्याच्या ओव्हर्स शिल्लक असतानाही गोलंदाजीच दिली नाही.

Arjun Tendulkar
आता समुद्रातील तरंगत्या ऑफिसमधून करा 'वर्क फ्रॉम गोवा'; 5G नेटवर्कसह विविध सुविधा पुरवणार

अर्जुन तेंडुलकरने बडोद्याविरुद्ध 5.80 च्या इकॉनॉमीसह 9 षटकात गोलंदाजी करताना एकूण 52 धावा दिल्या. त्यामुळे गोव्याचा कर्णधार दर्शन मिसाळने त्याला त्याचा ओव्हर्सचा कोटा पूर्ण करू दिला नाही आणि गोलंदाजी दुसऱ्या गोलंदाजाकडे सोपवली.

मात्र, त्यानंतरही सुरुवातीला दिलेल्या जादा धावांमुळे गोव्याला पराभवाचा सामना करावा लागला. या सामन्यात अर्जुनने बडोद्याविरुद्ध करताना 9 षटकांत 52 धावा देऊन केवळ एक विकेट घेतली. बडोद्याने हा सामना 4 विकेटने जिंकला.

Arjun Tendulkar
Goa Beach Erosion: गोव्याच्या बीचसाठी धोक्याची घंटा! राज्यातील 21 समुद्रकिनाऱ्यांची मोठी धूप

असा झाला सामना

बडोदा आणि गोवा यांच्यात खेळल्या गेलेल्या सामन्यात नाणेफेक गमावून प्रथम फलंदाजी करणाऱ्या गोव्याने निर्धारित 50 षटकांचीही फलंदाजी केली नाही आणि 48.4 षटकात केवळ 228 धावांवर गोव्याचा डाव आटोपला.

या छोट्या लक्ष्याचा पाठलाग करण्यासाठी उतरलेल्या बडोदा संघाने 47 षटकांत 4 गडी राखून सामना जिंकला. अभिमन्यू सिंह राजपूतने बडोद्यासाठी सर्वाधिक 71 धावांची खेळी केली.

दैनिक गोमंतकचे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Goa news in Marathi and Goa local news on Tourism, Business, Politics, Entertainment, Sports and Goa latest news in Marathi on Dainik Gomantak. Get Goa news live updates on the Dainik Gomantak Mobile app for Android and IOS.

Related Stories

vijai sardesai warns goa govt
mla vijai sardesai slams goa govt
MLA Vijai Sardesai Court Warning
Arjun Tendulkar Inspiration
Goa News in Marathi - Dainik Gomantak
dainikgomantak.esakal.com