International Sex racket busted in Anjuna Goa : हणजूण पोलिसांनी शुक्रवारी आंतरराष्ट्रीय सेक्स रॅकेटचा पर्दाफाश करून पाच तरुणींची सुटका केली, तर दोन केनियन महिला दलालांना अटक केली. केनियातील शिक्षित तरुणींना गोव्यात हॉस्पिटॅलिटी उद्योगात नोकरीचे आमिष दाखवून त्यांची तस्करी करून वेश्या व्यवसायात गुंतवल्याचे उघड झाले.
दरम्यान, या प्रकरणात आता नवा ट्विस्ट समोर आला असून, या रॅकेटला पोलिसांचे अभय होते असा आरोप केला जात आहे.
पोलिसांनी उघडकीस आणलेल्या या सेक्स रॅकेट प्रकरणात हणजूण पोलीस ठाण्यातील पोलीस कर्मचाऱ्याचा सहभाग असल्याचे समोर आले आहे. एक पोलीस कर्मचारी सहभागी संशयित आरोपींकडून प्रोटेक्शन मनी घेत असल्याची धक्कादायक माहिती समोर आली आहे. या पोलीस कर्मचाऱ्यांची तातडीने बदली केल्याचे सांगितले जात असून, अंतर्गत चौकशीला सुरूवात केल्याची प्राथमिक माहिती आहे.
दरम्यान, या नव्या ट्विस्टमुळे या प्रकरणाला पोलिसांचे अभय आहे का? असा प्रश्न उपस्थित केला जात आहे.
महिला तस्करीविरोधात काम करणाऱ्या ‘अर्ज’ एनजीओला केनियाच्या तरुणींना बंगळुरू येथे वेश्या व्यवसायासाठी दलाल घेऊन जाणार असल्याची माहिती मिळाली होती. त्यानुसार त्याची माहिती हणजूण पोलिसांना देऊन ही कारवाई करण्यात आली.
सुमारे पाच वर्षे गोव्यात हे रॅकेट सुरू होते. मात्र हे रॅकेट चालविणारे संशयित वारंवार ठिकाण बदलत असल्याने ते पोलिसांच्या हाती लागत नसत. केनिया येथून गोव्यात नोकरीचे आमिष दाखवून गोव्यात आणलेल्या या युवतींना गोवा आणि बंगळूर येथे वेश्या व्यवसायास जुंपले जात असे.
दैनिक गोमंतकचे सदस्य व्हा
Read Goa news in Marathi and Goa local news on Tourism, Business, Politics, Entertainment, Sports and Goa latest news in Marathi on Dainik Gomantak. Get Goa news live updates on the Dainik Gomantak Mobile app for Android and IOS.