Intelligent Traffic Management System: 26 ठिकाणी 'एआय' कॅमेरे, 1 जुलैपासून करडी नजर; राज्‍यात 'स्मार्ट ट्रॅफिक' युगाचा प्रारंभ

Traffic Monitoring at 26 Junctions: वाहतूक नियमांचे उल्लंघन रोखण्‍याबरोबरच वाढत्‍या अपघातांवर नियंत्रण आणण्‍यासाठी वाहतूक खात्‍याने येत्‍या १ जुलैपासून इंटेलिजेंट ट्रॅफिक मॅनेजमेंट सिस्टमद्वारे (आयटीएमएस) लक्ष ठेवण्‍याचे निश्‍चित केले आहे.
Intelligent Traffic Management System
Intelligent Traffic Management SystemDainik Gomantak
Published on
Updated on

पणजी: वाहतूक नियमांचे उल्लंघन रोखण्‍याबरोबरच वाढत्‍या अपघातांवर नियंत्रण आणण्‍यासाठी वाहतूक खात्‍याने येत्‍या १ जुलैपासून इंटेलिजेंट ट्रॅफिक मॅनेजमेंट सिस्टमद्वारे (आयटीएमएस) लक्ष ठेवण्‍याचे निश्‍चित केले आहे. त्‍यासाठी २६ जंक्‍शनची निवड करण्‍यात आली असून, ३० जूनच्या मध्यरात्रीपासून ही यंत्रणा कार्यान्वित होणार आहे.

‘आयटीएमएस’ प्रणालीद्वारे वाहतूक नियमांचे उल्लंघन करणाऱ्यांवर ऑनलाईन पद्धतीने तत्‍काळ दंडात्मक कारवाई करता येते. एआय, सेन्सर्स आणि ‘कम्प्युटर व्हिजन’सारख्‍या अद्ययावत अत्याधुनिक तंत्रज्ञानाचा वापर करून ही यंत्रणा वाहतूक आणि वाहनांच्या हालचालींवर बारीक लक्ष ठेवते. नियमांचे उल्लंघन केल्यास हायटेक कॅमेऱ्यांमध्‍ये वाहन कैद होते. चालकास पुराव्यासह दंडाचे डिजिटल चलन त्‍याच्‍या नोंदणीकृत मोबाईल क्रमांकावर पाठवले जाते.

वाहने सुस्‍थितीत ठेवण्‍याच्‍या सूचना : पावसाळ्याच्‍या पार्श्वभूमीवर वाहतूक खात्‍याने रस्‍त्‍यांवर चालणाऱ्या वाहनांची तपासणी करण्‍यासंदर्भातील मोहीम सुरू करण्‍याचा निर्णय घेतला आहे. त्‍यात वायपर्स, टायर आणि सुरक्षेसंदर्भातील इतर उपकरणांची तपासणी केली जाईल.

Intelligent Traffic Management System
Goa power supply: आधी रिचार्ज करा, मगच वीज वापरा! सुदिन ढवळीकरांच्या नव्या फतव्यानं गोमंतकीय संतापले; गोव्यात विरोधी पक्षांनी स्मार्ट मीटरविरोधात उगारले हत्यार

वाहनचालकांनी आपली वाहने रस्‍त्‍यावर चालवण्‍यास योग्‍य अशा स्‍थितीत ठेवावी, वाहतूक नियम उल्लंघनासंदर्भात जारी केलेल्‍या आदेशांचे पालन करावे, अन्‍यथा कायदेशीर कारवाई करण्‍यात येईल, असा इशाराही खात्‍याने दिला आहे.

Intelligent Traffic Management System
Goa Govrnment Jobs: सरकारी नोकरीचे स्वप्न होणार पूर्ण! विधानसभा निवडणुकीआधी नोकऱ्यांचा पाऊस; मुख्यमंत्र्यांचा मास्टरस्ट्रोक

हायटेक ठिकाणे : मेरशी, बिर्ला क्रॉस वेर्णा, बेळ्ळे-नावेली, जुने मार्केट सर्कल मडगाव, फातोर्डा, टाटा शोरूम नुवे, गोवा सिरॅमिक्स नुवे, गोरवटी-नुवे, नुवे बायपास, आर्ले सर्कल, बोलशे सर्कल घोगळ, मिसिंग लिंक लोटली, नावेली, पॉवर हाऊस सर्कल मडगाव, मुंज विहार सर्कल मडगाव, टायटन, आयएफबी, रवी कॅफे (वेर्णा), चिखली पंचायत, बेताळभाटी, ग्रीन हाऊस कोलवा, मारिया हॉल बाणावली, आंबेडकर सर्कल कुडचडे, तार-बस्तोडा म्हापसा, आकय-म्हापसा, धुळेर-म्हापसा.

दैनिक गोमंतकचे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Goa news in Marathi and Goa local news on Tourism, Business, Politics, Entertainment, Sports and Goa latest news in Marathi on Dainik Gomantak. Get Goa news live updates on the Dainik Gomantak Mobile app for Android and IOS.

Related Stories

Goa Traffic Fines Enforcement
Goa Traffic Congestion
Goa Traffic Fines
Illegal Fishing Goa: परराज्‍यांतील 13 ट्रॉलर्स जप्‍त, गोव्‍याच्‍या समुद्रात घुसखोरी; नियमांचे उल्लंघन करणाऱ्यांना 10 लाखांपर्यंत दंड
Goa News in Marathi - Dainik Gomantak
dainikgomantak.esakal.com