INSV Tarini Returns : अभिमानास्पद ; ‘तारिणी’ची ऐतिहासिक परिक्रमा पूर्ण

समुद्री थरार : 6 जणांचा क्रू, सात महिन्यांत तब्बल 31 हजार 484 किलोमीटरचा प्रवास
INSV Tarini
INSV TariniGomantak Digital Team

भारतीय नौदलाची सागरी नौका आयएनएसव्ही तारिणी यशस्वी ऐतिहासिक सागरी परिक्रमा करून पुन्हा गोव्यात दाखल झाली आहे. गोव्यात बनलेल्या आणि सात महिन्यांपूर्वी सागर सफरीवर गेलेल्या या नौकेने या सात महिन्यांमध्ये तब्बल 17,000 नॉटिकल मैलांचा (सुमारे 31 हजार 484 किलोमीटर) खडतर प्रवास केला आहे. मंगळवारी आयएनएसव्ही तारिणी गोव्यातील होम पोर्टवर परतली.

मुख्यमंत्री डॉ. प्रमोद सावंत, नौदल प्रमुख अ‍ॅडमिरल हरी कुमार, केंद्रीय महिला आणि बालविकास मंत्री स्मृती इराणी यांच्या उपस्थितीत या नौकेचा फ्लॅग इन सोहळा पार पडला. या मान्यवरांच्या उपस्थितीत या नौकेचे स्वागत झाले. या नौकेवरील कॅप्टन अतुल सिन्हा, लेफ्टनंट कमांडर आशुतोष शर्मा, ले. क. कमांडर निखिल हेगडे, लेफ्टनंट कमांडर दिलना के., लेफ्टनंट कमांडर रूपा ए. कमांडर दिव्या पुरोहित, कमांडर झुल्फिकार यांचे अभिनंदन करून मुख्यमंत्र्यांनी त्यांचे स्वागत केले.

INSV Tarini
Land Amendment Act : जमीन कायदा दुरुस्ती ही भांडवलदारांच्या हिताची-नगरनियोजनच्या सदस्यांचा सूर

नौकेची झाली दिवाडीत बांधणी

गोव्यातील दिवाडी येथे नौदलाच्या अॅक्वारिस शिपयार्ड येथे या नौकेचे बांधणी झाली आहे. या बोटीवर सहा नौदल अधिकाऱ्यांचा ताफा होता. दरम्यान, नौदल आता या नौकेवरून एका महिला अधिकाऱ्याला जगभ्रमंती मोहिमेवर पाठवण्याची तयारी करत आहे. त्या तयारीचा एक भाग म्हणून गतवर्षी 20 ऑगस्टपासून या नौकेतून दोन महिला अधिकाऱ्यांनी इतर चार अधिकाऱ्यांच्या फिरत्या क्रूसह अंतर-महासागर आंतरखंडीय प्रवास केला.

Read Goa news in Marathi and Goa local news on Tourism, Business, Politics, Entertainment, Sports and Goa latest news in Marathi on Dainik Gomantak. Get Goa news live updates on the Dainik Gomantak Mobile app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Goa News on Dainik Gomantak
dainikgomantak.esakal.com