Insurance for Sportspersons: गोव्यातील क्रीडापटूंसाठी विमा योजना

क्रीडामंत्री गावडे यांची राज्य विधानसभेत महत्त्वपूर्ण घोषणा
Insurance scheme for sports persons
Insurance scheme for sports persons Dainik Gomantak
Published on
Updated on

पणजी: गोव्यातील सर्व क्रीडांपटूंसाठी विमा योजना (Insurance Scheme) लागू करण्याची महत्त्वपूर्ण घोषणा क्रीडामंत्री गोविंद गावडे (Sports Minister Govind Gaude) यांनी बुधवारी राज्य विधानसभेत केली. त्यामुळे खेळताना दुखापती, तसेच कारकिर्दीवर संकट ओढवणाऱ्या खेळाडूंना मोठा दिलासा मिळेल.

राष्ट्रीय-आंतरराष्ट्रीय, राज्य पातळीवरील गोव्यातील क्रीडापटूंना सरकारी नोकऱ्यांमध्ये दोन टक्के राखीव जागा (two percent reservation in govt jobs) ठेवण्याचा प्रस्ताव असल्याची माहितीही क्रीडामंत्र्यांनी विधानसभेत दिली.

गोव्यातील क्रीडापटूंसाठी राष्ट्रीय स्पर्धेसाठी देशातील इतर भागात प्रवास करताना त्रास सहन करावा लागतो. काहीवेळा आरक्षण नसल्यामुळे खेळाडूंची कुंचबणा होते. या अडचणी टाळण्यासाठी सर्व राष्ट्रीय स्पर्धांतील सहभागासाठी प्रवासात थ्री टियर आरक्षण (Three tier reservation) सुविधा देण्यात येतील अशी घोषणाही क्रीडामंत्री गावडे यांनी बुधवारी विधानसभेत केली.

Insurance scheme for sports persons
विधानसभा अधिवेशन किती कार्यक्षम?

खेलो इंडिया (Khelo India) राज्य उत्कृष्टता योजनेअंतर्गत कांपाल येथे टेबल टेनिस, बॅडमिंटन, जलतरण या खेळांसाठी अकादमी स्थापन करून निवासी धर्तीवर केंद्र सुरू केल्याची माहितीही त्यांनी यावेळी दिली.

राष्ट्रीय स्पर्धेचा मार्ग मोकळा

भारतीय ऑलिंपिक संघटनेकडून (Indian Olympic Association) 2023 मधील 37 व्या राष्ट्रीय क्रीडा स्पर्धेचे यजमानपद गोव्याला देण्याबाबत ईमेल आल्याची माहिती क्रीडामंत्र्यांनी राज्य विधानसभेत दिली.

Insurance scheme for sports persons
सतीश धोंड यांची पश्चिम बंगाल भाजपच्या संयुक्त संघटन महामंत्रीपदी नियुक्ती

दैनिक गोमंतकचे सदस्य व्हा

Read Goa news in Marathi and Goa local news on Tourism, Business, Politics, Entertainment, Sports and Goa latest news in Marathi on Dainik Gomantak. Get Goa news live updates on the Dainik Gomantak Mobile app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
var bottom_sticky_ad = googletag .sizeMapping() .addSize([1000, 0], [[728, 90]]) .addSize( [0, 0], [ [320, 50], [300, 50], [320, 100] ] )         .build()
Goa News on Dainik Gomantak
dainikgomantak.esakal.com