मडकईतील महिलांना आता विमा कवच : सुदिन ढवळीकर

स्वयंसहाय्य गटांतील महिलांना लाभ; महिला मेळावा यशस्वी
Goa News | Sudin Dhavalikar
Goa News | Sudin DhavalikarDainik Gomantak
Published on
Updated on

महिलेमुळेच एखाद्या कुटुंबाला समृद्धता प्राप्त होते. म्हणूनच त्यांच्या सशक्तीकरणासाठी मडकई मतदारसंघातील स्वयंसहाय्य गटांत सहभागी सुमारे साडेसहा हजार महिलांचा विमा उतरवला जाईल आणि त्याचा लाभ संबंधित महिलांना करून दिला जाईल, अशी ग्वाही मडकईचे आमदार तथा वीजमंत्री सुदिन ढवळीकर यांनी दिली.

तळावली येथे महालक्ष्मी हायस्कूलच्या पटांगणात आज रविवारी माधवराव ढवळीकर ट्रस्टतर्फे मगो पक्ष तसेच कवळे व बांदोडा सेल्फ हेल्प ग्रुप फेडरेशनच्या सहकार्याने भव्य महिला मेळावा पार पडला. त्यावेळी ते बोलत होते.

Goa News | Sudin Dhavalikar
Lavani : चंद्रा’च्या दिलखेचक अदांनी रसिक घायाळ

मेळाव्याला उद्‍घाटक म्हणून डॉ. अनुपमा बोरकर, डॉ. शिरिष बोरकर, डॉ. जयश्री मडकईकर, ढवळीकर ट्रस्टचे विश्‍वस्त मिथिल ढवळीकर तसेच ज्योती ढवळीकर, जि. पं. सदस्य गणपत नाईक व प्रिया च्यारी, सरपंच वसुंधरा सावंत तळावलीकर, शैलेंद्र पणजीकर, सुखानंद कुर्पासकर, क्षिप्रा आडपईकर, मनुजा नाईक तसेच सर्वेश जल्मी यांच्यासह उपसरपंच चित्रा फडते तसेच उज्ज्वला नाईक, संध्या नाईक, फेडरेशनच्या अध्यक्ष अनुराधा काणकोणकर, महालक्ष्मी विद्यालयाच्या मुख्याध्यापिका सुनंदा वस्त, उर्वशी कवळेकर, नरेश गावडे, गोकुळदास गावडे व इतर मान्यवर मंडळी उपस्थित होती.

लक्षणीय उपस्थिती

मेळाव्यात १९६३ ते २०२२ पर्यंतच्या काळातील मडकई मतदारसंघातील प्रत्येक पंचायतीतील महिला पंचसदस्यांचा गौरव करण्यात आला. त्यात काही दिवंगत पंचसदस्यांचाही समावेश होता. तसेच कर्तृत्ववान महिलांना सन्मानित केले गेले.

याशिवाय विविध स्पर्धा तसेच मनोरंजनात्मक कार्यक्रमही झाले. दरम्यान, मेळाव्याचे स्वागत मिथिल ढवळीकर, सूत्रसंचालन सिद्धी उपाध्ये तर गोकुळदास गावडे यांनी आभार मानले.

Goa News | Sudin Dhavalikar
कुंडईत हरित ऊर्जा प्रकल्प साकारणार : सुदिन ढवळीकर

आरोग्याबद्दल मार्गदर्शन

डॉ. अनुपमा बोरकर यांनी महिलांना कर्करोगासंबंधी मार्गदर्शन केले. बदलती जीवनशैली कर्करोगाला कारणीभूत ठरत असल्याचे नमूद केले. डॉ. जयश्री मडकईकर यांनी महिलांना गर्भारपण तसेच इतर रोगासंंबंधी सविस्तर माहिती दिली. तर डॉ. शिरिष बोरकर यांनीही आरोग्यासंबंधीच्या काही टीप्स महिलांना दिल्या.

"महिला सक्षमीकरणासाठी ढवळीकर ट्रस्टतर्फे प्रयत्न केले जातील. पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या कल्पकतेतून साकारलेल्या महिलांसाठीच्या विमा कवच योजनेचा लाभ मडकईतील स्वयंसहाय्य गटातील महिलांना सहा महिन्यांत देण्यात येईल. आपत्कालीन वेळेला त्यांना याचा लाभ होईल."

- सुदिन ढवळीकर, वीजमंत्री

दैनिक गोमंतकचे सदस्य व्हा

Read Goa news in Marathi and Goa local news on Tourism, Business, Politics, Entertainment, Sports and Goa latest news in Marathi on Dainik Gomantak. Get Goa news live updates on the Dainik Gomantak Mobile app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
var bottom_sticky_ad = googletag .sizeMapping() .addSize([1000, 0], [[728, 90]]) .addSize( [0, 0], [ [320, 50], [300, 50], [320, 100] ] )         .build()
Goa News on Dainik Gomantak
dainikgomantak.esakal.com