Lok Sabha Election: केरी चेकनाक्यावर अबकारी खात्यातर्फे वाहनांची तपासणी

Lok Sabha Election: लोकसभा निवडणूक होईपर्यंत प्रक्रिया सुरूच राहणार
Lok Sabha Election
Lok Sabha ElectionDainik Gomantak
Published on
Updated on

Lok Sabha Election:

लोकसभा निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर गोवा-कर्नाटक यांच्या दरम्यान केरी व पर्ये येथील चेकनाक्यावर अबकारी व पोलिस खात्याकडून वाहनांची तपासणी सुरू केलेली आहे. गोव्यातून कर्नाटक व कर्नाटकमधून गोव्यामध्ये बेकायदेशीररीत्या दारूची वाहतूक होऊ नये यासाठी ही खबरदारी घेण्यात आलेली आहे.

अशा प्रकारची वाहने आढळल्यास त्यांच्यावर कडक कारवाई करण्यात येणार आहे. गेल्या आठ दिवसांपासून या तपासणीला सुरवात झाली असून लोकसभा निवडणूक होईपर्यंत ही प्रक्रिया सुरू राहणार असल्याचे अधिकाऱ्यांनी माहिती दिली आहे. अबकारी खात्याच्या वाळपई विभागातर्फे २४ तास या वाहनांची तपासणी करण्यात येत आहे.

Lok Sabha Election
Goa Tourism: देशांतर्गत पर्यटकांची पावले गोव्याकडे; किनाऱ्यांवर गर्दी

अल्कोहोल तपासणीही केली जाते

मालवाहू वाहनांच्या तपासणीबरोबर चारचाकी व दुचाकीचालकांची अल्कोहोल तपासणी केली जाते आहे. केरी चेकनाक्यावर एकूण ४९ वाहनांची तपासणी केली आहे तर १३९ जणांची वैयक्तिक तपासणी केली आहे. त्याचबरोबर पर्ये चेकनाक्यावर १७ वाहनांची तर वैयक्तिक ३४ जणांची तपासणी केली आहे. ही कारवाई तसेच तपासणी लोकसभा निवडणूक होईपर्यंत केली जाणार आहे.

दैनिक गोमंतकचे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Goa news in Marathi and Goa local news on Tourism, Business, Politics, Entertainment, Sports and Goa latest news in Marathi on Dainik Gomantak. Get Goa news live updates on the Dainik Gomantak Mobile app for Android and IOS.

Related Stories

Goa Excise Department liquor Seizure
Rahul Gandhi Amit Shah Firing Allegation
Telangana liquor Smuggling Case
Priyanka Gandhi Attack PM Modi
Goa News in Marathi - Dainik Gomantak
dainikgomantak.esakal.com