Peddem Junction: पेडे जंक्शनची आमदार फेरेरा यांच्याकडून पाहणी

पेडे येथील धोकादायक जंक्शनवरील घडणारे अपघात प्रयत्न
Peddem Junction
Peddem JunctionDainik Gomantak
Published on
Updated on

Peddem Junction: पेडे येथील धोकादायक जंक्शनवरील घडणारे अपघात टाळण्यासाठी नाताळ सणापूर्वी तात्पुरता तोडग्यासाठी पावले उचलावीत. त्यानंतर दूरगामी तोडगा काढावा अशी सूचना हळदोणेचे आमदार अ‍ॅड. कार्लुस फेरेरा यांनी केली.

दरम्यान, साबांखाने फ्लायओव्हरसाठी सध्या प्रस्ताव दिल्लीला पाठविला आहे. त्याला मंजूरी आल्यास हा प्रश्न बर्‍यापैकी सुटेल. मात्र, जोवर पर्याय लोकांना उपलब्ध करुन दिला जात नाही, तोवर जंक्शन बंद करणे उच्चित ठरणार नसल्याचे फेरेरा म्हणाले. कारण, स्थानिकांना खूप मनस्ताप सहन करावा लागू शकतो.

Peddem Junction
Goa Daily News Wrap: गोव्यात पर्यटकांची लूट सुरूच; नीलेश काब्राल यांच्यावर राजीनाम्याची वेळ! राज्यातील दिवसभरातील महत्वाच्या बातम्या

पेडे जंक्शनचे शनिवारी (ता.१८) आमदार फेरेरा यांनी राष्ट्रीय महामार्ग प्राधिकारणीच्या अधिकारी व पोलिसांसमवेत पाहणी केली. मागील चार वर्षापासून हे जंक्शन दुर्लक्षीत आहे. येथील फ्लायओवरची मागणीकडे डोळेझाक करण्यात आले. तसेच जंक्शनवरील अपघातांवर नियंत्रणासाठी कोणत्याच प्रकारची ठोस पाऊले प्रशासनाकडून उचलण्यात आली नाही.

जंक्शनवरील गतीवर नियंत्रणासाठी जे रंबर्ल्स बसवलेत ते योग्य नाहीत. परिणामी, वाहतूकदारांना त्रास सहन करावा लागतोय. यात दुरुस्तीची गरज फेरेरांनी व्यक्त केली. यापूर्वी याठिकाणी फ्लायओव्हर येणार होता. मात्र, अनेक कारणास्तव हा प्रस्ताव डावलण्यात आल्याचे फेरेरा म्हणाले.

मुळात हा जंक्शन आराखड्यानुसार नसल्याने दररोज येथे अपघात घडत असल्याचे ट्रोजन डिमेलो म्हणाले. त्यामुळे एखादा गंभीर स्वरुपाचा अपघात झाल्याशिवाय कोणालाच जाग येणार नसल्याची उपरोधक टीका त्यांनी केली.

पालकांना सकाळच्या वेळी मुलांना शाळेत जातेवळी रस्ता ओलंडणे अत्यंत धोकादायक होत असल्याचे मर्लीन रॉड्रिग्स म्हणाल्या. किशोर राव यांनी जंक्शनचा वापर हजारो लोक करतात पण त्याकडे दुर्लक्ष होत असल्याचे म्हटले. तसेच जंक्शनवर दिवसभर पोलीस राहत नसल्याने या अपघातात भर पडत असल्याचे ते म्हणाले.

दैनिक गोमंतकचे सदस्य व्हा

Read Goa news in Marathi and Goa local news on Tourism, Business, Politics, Entertainment, Sports and Goa latest news in Marathi on Dainik Gomantak. Get Goa news live updates on the Dainik Gomantak Mobile app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
var bottom_sticky_ad = googletag .sizeMapping() .addSize([1000, 0], [[728, 90]]) .addSize( [0, 0], [ [320, 50], [300, 50], [320, 100] ] )         .build()
Goa News on Dainik Gomantak
dainikgomantak.esakal.com