फेरीबोट
फेरीबोट Dainik Gomantak

पणजी फेरीबोट धक्क्याजवळ नव्या बांधकामाची पाहणी

महापौरांची माहिती, नगरसेवक असमाधानी
Published on

पणजी: पणजी फेरीबोट धक्क्याजवळ सुरू असलेल्या बांधकामाबाबत प्रवासी व बेतीवासियांनी बंदर कप्तानला घेराव घातल्यानंतर त्या बांधकामाची तपासणी करण्यात आली. फेरीबोट सेवेच्या ठिकाणी कोणताच अडथळा नसून फेरीसेवा वेळेनुसार सुरूच राहील असे महापौर रोहित मोन्सेरात यांनी स्पष्ट केले असले तरी या तपासणीबाबत स्थानिक नगरसेवकाने असमाधान व्यक्त केले आहे. या फेरीबोट धक्क्याजवळ तरंगत्या कसिनोसाठी धक्का बांधण्यात येत असल्याने व तेथे पाण्यामध्ये खांब घालण्याचे काम केले जात असल्याने वारंवार फेरीसेवा बंद ठेवली जात होती.

फेरीबोट
नाट्य स्पर्धेची तयारी जोरात सुरू

त्यामुळे संतप्त बनलेल्या बेती वासियांनी त्याविरुद्ध मोर्चा काढून बंदर कप्तानला धारेवर धरले होते. महापौर रोहित मोन्सेरात यांनी स्थानिक नगरसेवकांसमवेत या बांधकामाची पाहणी केली. या बांधकामात काहीच गैर नाही व तसे असते तर बंदर कप्तानने त्याला परवागनी दिली नसती.यासंदर्भात स्थानिक नगरसेवकांनी या फेरीबोट धक्य्याशेजारी सुरू असलेल्या बांधकामाबाबत असमाधान व्यक्त केले. या कामाबाबत ते समाधानी नसून कोणत्याही परिस्थितीत नियमित फेरीसेवेच्या वेळा बंद करू दिल्या जाणार नाहीत. पुढील महापालिका बैठकीत हा प्रश्‍न उपस्थित करू असेही ते म्हणाले.

फेरीबोट
साळमध्ये गडे उत्सवाची तयारी जोरात

आमदारांना विनंती करू...

हल्लीच बेतीवासियांनी बंदर कप्तानला घातलेल्या घेरावावेळी साळगावचे आमदार केदार नाईक व मुरगाव आमदार संकल्प आमोणकर यांनी मोर्चेकरांना पाठिंबा व्यक्त केला होता. पणजी महापालिका या प्रश्‍नाकडे डोळेझाक करत असल्याने हा प्रश्‍न विधानसभेत उपस्थित करण्यासाठी आमदारांना विनंती केली जाणार असल्याचे मत नगरसेवकाने व्यक्त केले.

Read Goa news in Marathi and Goa local news on Tourism, Business, Politics, Entertainment, Sports and Goa latest news in Marathi on Dainik Gomantak. Get Goa news live updates on the Dainik Gomantak Mobile app for Android and IOS.

var bottom_sticky_ad = googletag .sizeMapping() .addSize([1000, 0], [[728, 90]]) .addSize( [0, 0], [ [320, 50], [300, 50], [320, 100] ] )         .build()
Goa News on Dainik Gomantak
dainikgomantak.esakal.com