दक्षिण गोवा पोलिस अधीक्षकांची चौकशी करा, खुनाचा प्रयत्न केल्याप्रकरणी मडगावच्या PSI विरोधात गुन्हा दाखल करण्याची मागणी

Margao police complaint: राज्यातील कायदा आणि सुव्यवस्था पूर्णपणे ढासळली असल्याचा आरोप आम आदमी पक्षाचे गोवा अध्यक्ष अमित पालेकरांनी केला.
Margao PSI attempt to murder case
South Goa SP inquiryDainik Gomantak
Published on
Updated on

मडगाव: नावेलीचा युवक एडबर्ग परेरा मारहाण प्रकरणी दक्षिण गोवा पोलिस अडचणीत सापडण्याची शक्यता निर्माण झाली आहे. परेरा मारहाण प्रकरणी दक्षिण गोवा पोलिस अधीक्षकांच्या भूमिकेवर प्रश्नचिन्ह निर्माण करण्यात आले आहे. तसेच, मडगाव पोलिस स्थानकातील पोलिस उपनिरीक्षक निलेश वळवईकरांवर खुनाचा प्रयत्न केल्याप्रकरणी गुन्हा नोंद करण्याची मागणी केली जातेय.

आम आदमी पक्षाचे गोवा अध्यक्ष अमित पालेकरांनी गोमेकॉत जखमी एडबर्ग परेरा यांची भेट घेऊन तब्येतीची विचारपूस केली. पालेकरांनी यावेळी परेरा यांना आवश्यक कायदेशीर आणि नैतिक पाठिंबा देण्याचे आश्वासन दिले.

राज्यातील कायदा आणि सुव्यवस्था पूर्णपणे ढासळली असल्याचा आरोप यावेळी त्यांनी केला. तसेच, निलंबित पोलिस उपनिरीक्षक निलेश वळवईकर यांच्या विरोधात खुनाचा प्रयत्न केल्याप्रकरणी गुन्हा नोंद करण्याची मागणी पालेकरांनी केली.

Margao PSI attempt to murder case
Goa Sand Mafia Raj: गोव्यातील गोळीबाराची देशात चर्चा; 'एक्स'वर वाळू माफिया राज हॅशटॅग ट्रेन्डिंग

"राज्यातील कायदा आणि सुव्यवस्था पूर्णपणे ढासळली आहे. मुख्यमंत्री तथा गृहमंत्री डॉ. प्रमोद सावंत यासाठी जबाबदार आहेत. गोवा पोलिसांचे बाऊन्सर्स आणि गुंडामध्ये रुपांतर झाले आहे. प्रामुख्याने नव्याने नियुक्त झालेले पोलिस उपनिरीक्षक खंडणीखोर आणि गुंड म्हणून काम करतायेत.

एडबर्ग हे त्याचे ताजे उदाहरण असून, तो जीवनमरणाशी लढा देतोय. पीएसआय निलेश शिरवईकरविरोधात खुनाचा प्रयत्न केल्याप्रकरणी गुन्हा नोंद करायला हवा", असे पालेकर म्हणाले.

दुसरीकडे सामाजिक कार्यकर्त्या प्रतिमा कुतिन्हो यांनी देखील हे प्रकरण लावून धरले असून, त्यांनी थेट दक्षिण गोवा पोलिस अधीक्षक टीकम सिंग वर्मा यांच्या भूमिकेवर प्रश्नचिन्ह उपस्थित केले आहे. रेकॉर्ड वरील गुन्हेगारांना व्हिआयपी वागणूक दिली जाते तर राज्यातील तरुणांना सावत्र आईची वागणूक दिली जाते, असे कुतिन्हो म्हणाल्या.

Margao PSI attempt to murder case
साखळीनं बांधून मारहाण केली, 'तो' रक्ताच्या थारोळ्यात पडला होता, आईने फोडला हंबरडा; मडगाव पोलिसांवर केले गंभीर आरोप

टीकमसिंग वर्मा यांनी दिलेल्या प्रतिक्रियेवर देखील कुतिन्हो यांनी प्रश्नचिन्ह उपस्थित करत त्यांची देखील याप्रकरणी चौकशी करायला हवी, अशी इच्छा व्यक्त केली. तसेच, मुख्यमंत्री सावंत यांनी याप्रकरणात लक्ष घालून वर्मा यांच्याविरोधात चौकशीचे आदेश द्यावेत, अशी मागणी कुतिन्हो यांनी केली. एडबर्गला पोलिस स्थानकात साखळदंडाने बांधले होते याचे पुरावे त्यांच्याकडे असल्याचा दावाही कुतिन्हो यांनी केला आहे.

दैनिक गोमंतकचे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Goa news in Marathi and Goa local news on Tourism, Business, Politics, Entertainment, Sports and Goa latest news in Marathi on Dainik Gomantak. Get Goa news live updates on the Dainik Gomantak Mobile app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Goa News on Dainik Gomantak
dainikgomantak.esakal.com