CM Pramod Sawant: केंद्राच्या योजना राबविण्यासाठी जिल्हा पंचायतींचा पुढाकार आवश्यक - मुख्‍यमंत्री सावंत

जिल्हा पंचायत विकास आराखडा जाहीर
CM Pramod Sawant
CM Pramod SawantDainik Gomantak
Published on
Updated on

CM Pramod Sawant गोवा हे छोटे राज्य असल्याने विकास योजना राबविण्यासाठी विविध यंत्रणा सक्रीय आहेत. विकास प्रक्रिया अधिक गतिमान करण्यासाठी केंद्र सरकारच्या योजना राज्यात राबविण्यासाठी जिल्हा पंचायतींनी पुढाकार घ्यावा, असे आवाहन मुख्यमंत्री डॉ. प्रमोद सावंत यांनी केले.

उत्तर गोवा जिल्हा पंचायतीने जिल्हा पंचायत विकास आराखडा आज प्रदर्शित केला. त्‍याच्‍या उद्‌घाटन कार्यक्रमात मुख्‍यमंत्री बोलत होते.

ते म्हणाले की, आपले राज्य इतर राज्यांच्या तुलनेत छोटे आहे. स्थानिक स्वराज्य संस्थेची द्विस्तरीय पद्धत गोव्यात आहे.

CM Pramod Sawant
Goa Petrol-Diesel Price: गोव्यातील पेट्रोल-डिझेल दरांत वाढ; जाणून घ्या आजचे दर

त्यामुळे विकासाच्या विविध यंत्रणा सक्रिय आहेत. मात्र राज्य सरकारकडे असलेल्या अनेक योजना जिल्हा पंचायतीला राबवता येऊ शकतात. यासाठी राज्य सरकारकडून बिगरसरकारी संस्थांना विशेष अनुदान दिले जाते.

शिवाय केंद्र सरकारकडूनही 100 टक्के अनुदानाच्या विविध योजना आहेत. या योजना राज्यात राबवण्यासाठी जिल्हा पंचायतींनी पुढाकार घेतल्यास त्याचा राज्याला फायदा होईल, असे मुख्‍यमंत्री म्‍हणाले.

CM Pramod Sawant
Goa Forward Party: सरकारची 'ती' योजना संशयास्पद, ॲक्सिस बँकेबाबत स्पष्टीकरण द्यावे

पंधरा दिवसांत जिल्हा पंचायत विकास आराखड्याची राज्यस्तरावरची बैठक बोलवण्यात येईल. या बैठकीत आपण दिलेले प्रकल्प मार्गी लावण्यात येतील.

उत्तर गोवा जिल्हा पंचायतीचे स्वतंत्र पंचायत भवन उभारणे अपेक्षित आहे. यासाठी राज्य सरकार आर्थिक मदत देईल. पंचायतीने जागा शोधावी, असेही मुख्यमंत्री म्हणाले.

माजी अध्यक्ष, उपाध्यक्षांचा सत्कार

या कार्यक्रमात उत्तर गोवा जिल्हा पंचायत माजी अध्यक्ष, उपाध्यक्षांचा सत्कार करण्यात आला. यावेळी केंद्रीय मंत्री श्रीपाद नाईक, पंचायतमंत्री माविन गुदिन्हो, पंचायत सचिव मिनिनो डिसोझा, मिचिअल डिसोझा, सिद्धी हळर्णकर (संचालक), अजय गावडे, (मुख्य कार्यकारी अधिकारी) व सिद्धेश नाईक (अध्यक्ष, उत्तर गोवा जिल्हा पंचायत) यांची उपस्थिती होती.

दैनिक गोमंतकचे सदस्य व्हा

Read Goa news in Marathi and Goa local news on Tourism, Business, Politics, Entertainment, Sports and Goa latest news in Marathi on Dainik Gomantak. Get Goa news live updates on the Dainik Gomantak Mobile app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
var bottom_sticky_ad = googletag .sizeMapping() .addSize([1000, 0], [[728, 90]]) .addSize( [0, 0], [ [320, 50], [300, 50], [320, 100] ] )         .build()
Goa News on Dainik Gomantak
dainikgomantak.esakal.com