Goa Assembly Monsoon Session : वीज खात्यात 'एवढी' पदे रिक्त वीजमंत्र्याची विधानसभेत माहिती

चालक, लाईनमन, लाईन हेल्परचा अधिक समावेश
Sudin Dhavlikar
Sudin DhavlikarDainik Gomantak
Published on
Updated on

Goa Assembly Monsoon Session : गेल्या साडेचार वर्षांपासून वीज खात्यात विविध सुमारे १२०० पदे रिक्त आहेत. अधिक तर पदे चालक, लाईनमन, साहाय्यक लाईनमन व लाईन हेल्पर यांची आहेत, अशी माहिती वीजमंत्री सुदिन ढवळीकर यांनी विधानसभेत लेखी उत्तरात दिली. माजी मुख्यमंत्री व आमदार दिगंबर कामत यांनी याबाबत प्रश्‍न विचारला होता.

वीज खात्यात १८३ साहाय्यक अभियंत्यांच्या जागा भरण्यासाठी संमती आहे, मात्र सध्या १४८ जागा भरण्यात आलेल्या आहेत. ३५ जागा रिक्त आहेत. कनिष्ठ अभियंता (वीज) पदासाठी २९१ जागा मंजूर असून २३२ जागा भरल्या आहेत.

अजून ५९ अभियंत्यांची कमतरता आहे. कारकून व मीटर रीडर्सच्या अनुक्रमे ३४ व २५ जागा रिक्त आहेत. खात्यात ८३२ लाईनमन तथा वायरमनच्या जागांना मंजुरी असताना सध्या ६९४ कर्मचारी आहेत. १३४ जागा रिक्त आहेत.

या खात्यात वाहनचालकांची मोठी कमतरता आहे. २७९ पदांना संमती असताना १७९ पदे भरलेली आहेत. १०० चालकांची पदे रिक्त आहेत.

Sudin Dhavlikar
Goa Assembly Monsoon Session 2023 : बंद सरकारी शाळांच्या इमारतींमध्ये भरणार अंगणवाड्या : प्रमोद सावंत

पदांची संख्‍या कमी, मात्र अर्जांचा पाऊस

वीज खात्यातील रिक्त जागा वेळोवेळी जाहिराती देऊन भरण्यासाठी प्रयत्न करण्यात आले. १७ ऑगस्ट २०२१ रोजी कनिष्ठ अभियंता, स्टेशन ऑपरेटर, कारकून तसेच मीटर रीडर्ससाठी रिक्त जागा भरण्यात आल्या. खात्याने नोकरभरती प्रक्रिया करून या रिक्त जागा भरल्या असल्या तरी अजूनही १२०० पदे रिक्त आहेत.

आतापर्यंत ६०८९ जागा भरल्या

साहाय्यक लाईनमन तथा वायरमन या पदासाठी १३८२ जागा मंजूर आहेत. मात्र ११७५ कर्मचारी नियमित सेवेत आहेत. त्यातील २०७ जागा अजून भरलेल्या नाहीत. लाईन हेल्परसाठी २३३० जागा असताना २०१९ कर्मचारी सेवेत आहेत. ३०१ जागा रिक्त आहेत.

Sudin Dhavlikar
Goa Assembly Monsoon Session: 'वीज खात्यात 145 कोटींचा घोटाळा', भाजप आमदारांचा सरकारला घरचा आहेर

खात्यातील विविध पदांसाठी ७२८९ जागा मंजूर झालेल्या आहेत. पैकी ६०८९ जागा भरलेल्या आहेत तर १२०० पदे अजूनही रिक्त आहेत, अशी माहिती मंत्र्यांनी लेखी उत्तरात दिली आहे.

  1. ११ कारकून पदासाठी - ८२४२अर्ज

  2. ७९ मीटर रीडर्ससाठी - २८३५ अर्ज

  3. १७ साहाय्यक डेटा एंट्री ऑपरेटर्ससाठी - २७४५ अर्ज

  4. ५५५ लाईन हेल्पर पदासाठी - ११,६२४ अर्ज

Read Goa news in Marathi and Goa local news on Tourism, Business, Politics, Entertainment, Sports and Goa latest news in Marathi on Dainik Gomantak. Get Goa news live updates on the Dainik Gomantak Mobile app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Goa News on Dainik Gomantak
dainikgomantak.esakal.com