Influencers In Goa: एन्फ्लुएन्सर्सना मिळाला राजाश्रय; आता वर्षाकाठी मिळणार कोट्यावधी रुपये

Influencers In Goa: इन्टाग्राम, ट्विटर आणि फेसबुक या समाज माध्यमांवर मोठे फॉलोईंग, युट्युबवर सबस्क्रायबर्सची संख्या मोठी असलेल्या प्रभावशाली व्यक्तींची, सेवा सरकारी योजनांचा प्रसार आणि सरकारची भूमिका जनतेपर्यंत पोचवण्यासाठी मदत घेणार आहे.
Influencers In Goa
Influencers In GoaDainik Gomantak

Influencers In Goa: इन्टाग्राम, ट्विटर आणि फेसबुक या समाज माध्यमांवर मोठे फॉलोईंग, युट्युबवर सबस्क्रायबर्सची संख्या मोठी असलेल्या प्रभावशाली व्यक्तींना मिळून वर्षाकाठी दोन कोटी 12 लाख 2,500 रुपयांचे मानधन देऊन सरकार त्यांची सेवा सरकारी योजनांचा प्रसार आणि सरकारची भूमिका जनतेपर्यंत पोचवण्यासाठी घेणार आहे.

Influencers In Goa
PM Narendra Modi: पंतप्रधानांच्या हस्ते सहा प्रकल्पांना चालना; 6 रोजी केवळ सरकारी कार्यक्रम

राजस्थाननंतर अशी योजना लागू करणारे गोवा हे दुसरे राज्य ठरले आहे. सरकार आता आपले म्हणणे आणि योजनांची माहिती जनतेपर्यंत पोचवण्यासाठी समाज माध्यमांवरील प्रभावशाली व्यक्तींची मदत घेणार आहे. त्यांना त्या बदल्यात आर्थिक लाभ दिला जाणार आहे. माहिती व प्रसिद्धी खाते तसेच गोवा मनोरंजन संस्था यांच्या संयुक्त विद्यमाने ही अनोखी योजना राबवली जाणार आहे.

मंत्रालयात मुख्यमंत्री डॉ. प्रमोद सावंत यांनी या योजनेची सुरवात संगणकाची कळ दाबून केली.मुख्यमंत्र्यांनी सांगितले, की ट्विटर, फेसबुक आणि इन्टाग्रामवरील फॉलोअर्स आणि यु ट्युबवरील सबस्क्रायबर्स यांची संख्‍या पाहून सरकारला मदत करणाऱ्यांना किती मानधन द्यावे, याचा निर्णय घेणार आहे.

यासाठी १४ फेब्रुवारीपर्यंत गोवा मनोरंजन संस्थेच्या संकेतस्थळावर या योजनेत सहभागी होऊ इच्‍छीणाऱ्यांना नावनोंदणी करावी लागेल. त्यासाठी अर्जदार १५ वर्षे गोव्यात वास्तव्यास असलेला व १८ वर्षांवरील वयाचा असावा, या किमान अटी आहेत. शिवाय किती फॉलोअर्स, सबस्क्रायबर्स कोणत्या समाज माध्यमावर आहेत, याची माहिती त्याला द्यावी लागेल.

दिलेल्या माहितीची छाननी संस्था नेमण्यास असलेली समिती करणार आहे. त्यानंतर सेवा देण्यासाठी नोंदणी झालेल्या अर्जदाराशी सुरवातीला एक वर्षाचा करार केला जाणार आहे. त्यात या कराराचे दोन वर्षांपर्यंत नूतनीकरण करण्याची तरतूद आहे.

Influencers In Goa
Goa Electricity: मयडेत वीजवाहिन्यांची होणार संयुक्त पाहणी

त्यांनी सांगितले, की समाज माध्यमांवर अनेकजणांकडून राज्याची बदनामी केली जाते. त्यांना त्याच माध्यमातून उत्तर दिले पाहिजे. याशिवाय समाज माध्यमांवरील प्रभावशाली व्यक्ती देत असलेले संदेश लोकही गांभीर्याने घेतात, सरकारी योजना लोकांपर्यंत पोचवण्यासाठी आणि सरकारी म्हणण्याचा प्रसार, प्रचार करण्यासाठी या व्यक्तींची सेवा सरकार घेणार आहे. १ लाख सबस्क्रायबर्स, फॉलोअर्स असणाऱ्यांचा एक गट असे संख्येनुसार गट केले जातील. त्यानुसार मानधन किती द्यायचे, याचा निर्णय घेण्यात येईल.

यावेळी संस्थेच्या उपाध्यक्ष आमदार दिलायला लोबो आणि मुख्य कार्यकारी अधिकारी अंकिता मिश्रा उपस्थित होत्या.

Read Goa news in Marathi and Goa local news on Tourism, Business, Politics, Entertainment, Sports and Goa latest news in Marathi on Dainik Gomantak. Get Goa news live updates on the Dainik Gomantak Mobile app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Goa News on Dainik Gomantak
dainikgomantak.esakal.com