CM Pramod Sawant: युवकांसाठी उद्योग हेच भविष्य!

CM Pramod Sawant: मुख्यमंत्री प्रमोद सावंत: पणजीत ‘ईडीआयआय’ केंद्राचे उद्‍घाटन
Goa CM Pramod Sawant
Goa CM Pramod SawantDainik Gomantak

CM Pramod Sawant:

राज्यातील युवकांनी उद्योग निर्माण केला असता, तर विविध क्षेत्रांत परराज्यातील लोकांनी येऊन उद्योगात जम बसवलेला दिसला नसता. उद्योग हेच आता भविष्य आहे, हे इथल्या युवकांनी लक्षात घेतले पाहिजे.

त्यामुळे राज्यातील युवकांनी उद्योगाकडे लक्ष केंद्रीत करणे गरजेचे आहे. त्यासाठी आर्थिक विकास महामंडळ (ईडीसी) व गोवा सीएसआर प्राधिकरणाद्वारे भारतीय उद्योजकता विकास संस्थेमार्फत (ईडीआयआय) युवकांना उद्योगांविषयी प्रशिक्षण दिले जाणार आहे, त्याचा लाभ युवकांनी घ्यावा, असे आवाहन मुख्यमंत्री प्रमोद सावंत यांनी केले.

येथील ईडीसीच्या पाचव्या मजल्यावर स्थापन झालेल्या ‘ईडीआयआय’ केंद्राच्या उद्‍घाटनप्रसंगी ते प्रमुख पाहुणे म्हणून बोलत होते. याप्रसंगी अहमदाबाद येथील ईडीआयआयचे महासंचालक डॉ. सुनील शुक्ला, दलित इंडियन चेंबर ऑफ कॉमर्स अँड इंडस्ट्रीचे (डीक्की) चेअरमन मिलिंद कांबळे,

Goa CM Pramod Sawant
Water Problem: रगाडा नदीच्या पाण्याचे नमुने पुन्हा तपासणीला

ईडीसीचे उपाध्यक्ष संजय सातार्डेकर, गोवा सीएसआर प्राधिकरणाचे संयुक्त मुख्य कार्यकारी अधिकारी डॉ. विजय सक्सेना, ईडीसीचे व्यवस्थापकीय संचालक बी. एस. पै आंगले यांची उपस्थिती होती.

पारंपरिक उद्योगांचा विस्तार व्हावा !

वैद्यकीय, अभयारण्य पर्यटनाला लागणारे उद्योग निर्माण होऊ शकतात, त्यादृष्टीने पाहिले गेले पाहिजे, असे सांगून ते म्हणाले, पारंपरिक उद्योगांचा विस्तार करण्यासाठी या प्रशिक्षणाचा उपयोग युवकांनी करून घ्यावा. उद्योगांमध्ये निश्‍चित स्वयंपूर्ण होण्याची ताकद आहे, फक्त करणाऱ्यांमध्ये इच्छाशक्ती हवी आहे. फूड प्रोसेसमध्ये मोठा वाव आहे, त्यात फार कमी स्थानिक लोक आहेत, याकडे युवकांनी लक्ष वळविले तर चांगली संधी असल्याचे मुख्यमंत्री सावंत यांनी नमूद केले.

Read Goa news in Marathi and Goa local news on Tourism, Business, Politics, Entertainment, Sports and Goa latest news in Marathi on Dainik Gomantak. Get Goa news live updates on the Dainik Gomantak Mobile app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Goa News on Dainik Gomantak
dainikgomantak.esakal.com