Indore-Goa Flight Delay: इंदूर-गोवा विमान तांत्रिक बिघाडामुळे रखडले; प्रवाशांना उतरवले खाली

Goa flight news: दुपारी १२.२० वाजता इंदूरहून उड्डाण करणाऱ्या या विमानाने अजून गोव्यासाठी झेप घेतलेली नाही
 goa flight delay update
goa flight delay updateDainik Gomantak
Published on
Updated on

flight disruption Indore Goa: एअर इंडिया एक्सप्रेसच्या इंदूरहून गोव्यातील मनोहर आंतरराष्ट्रीय विमानतळ, मोपा येथे जाणाऱ्या विमानात रविवार (दि.४) रोजी काही तांत्रिक बिघाड झाल्याने प्रवाशांना मोठा मनस्ताप सहन करावा लागलाय. दुपारी १२.२० वाजता इंदूरहून उड्डाण करणाऱ्या या विमानाने अजून गोव्यासाठी झेप घेतलेली नाही.

मिळालेल्या माहितीनुसार, विमानात काहीतरी तांत्रिक समस्या उद्भवल्याने ते निर्धारित वेळेनुसार उड्डाण करू शकले नाही. बराच वेळ लोटल्यावरही विमान सुरू न झाल्याने अखेर त्यांना खाली उतरवण्यात आलेय.

 goa flight delay update
Goa Indore Flight: खराब हवामानाचा फटका! एक तास हवेत घिरट्या घालत होतं विमान; प्रवाशांचा जीव टांगणीला

यामुळे विमानतळावर प्रवाशांमध्ये गोधळ निर्माण झाला आणि अनेक प्रवाशांच्या पुढील नियोजनावर याचा परिणाम होणार असल्याची शक्यता आहे.

दरम्यान, विमान कंपनीच्या अधिकाऱ्यांनी तांत्रिक बिघाड दुरुस्त करण्याचे काम सुरू असल्याचे सांगितले आहे. दुरुस्ती पूर्ण झाल्यावर विमान गोव्यासाठी रवाना होईल, अशी शक्यता वर्तवण्यात येत आहे.

नवीन अंदाजित वेळेनुसार, हे विमान दुपारी २.५५ वाजता गोव्यात पोहोचण्याची शक्यता आहे. इंदूर-गोवा मार्गावर इंडिगोसारख्या इतर विमान कंपन्यांच्याही नियमित उड्डाणे असतात. काही विमानांना इतर शहरांमध्ये थांबावे लागते. मात्र, आज एअर इंडियाच्या विमानात झालेल्या या बिघाडामुळे प्रवाशांना नाहक वेळेच्या त्रासाला सामोरे जावे लागले.

खराब हवामानाचा फटका

यापूर्वी देखील इंदूरहून गोव्याला निघालेल्या विमानामध्ये मंगळवारी संध्याकाळी अचानक खराब झालेल्या हवामानाचा विमान वाहतुकीला फटका बसला होता. गोव्याहून इंदूरला येणाऱ्या विमानाला खराब हवामानामुळे लँडिगची परवानगी मिळाली नाही आणि विमान तब्बल १ तास इंदौरच्या आकाशात प्रदक्षिणा घालत राहिले होते. अखेर तासाभरानंतरही हवामान साफ ​​न झाल्याने विमान अहमदाबादला वळवण्यात आले.

दैनिक गोमंतकचे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Goa news in Marathi and Goa local news on Tourism, Business, Politics, Entertainment, Sports and Goa latest news in Marathi on Dainik Gomantak. Get Goa news live updates on the Dainik Gomantak Mobile app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Goa News on Dainik Gomantak
dainikgomantak.esakal.com