Indian Super League: एफसी गोवाविरुद्ध बंगळूर एफसी उद्या सामना रंगणार; कोण मारणार बाजी?

Head coach Manolo Marquez: एफसी गोवा संघ चांगला खेळतोय, पण सातत्याचा अभाव आहे, त्यामुळे संघाचे नुकसान होत असल्याचे मत मुख्य प्रशिक्षक मानोलो मार्केझ यांनी बुधवारी व्यक्त केले.
Head coach Manolo Marquez
Head coach Manolo MarquezDainik Gomantak
Published on
Updated on

Indian Super League:

एफसी गोवा संघ चांगला खेळतोय, पण सातत्याचा अभाव आहे, त्यामुळे संघाचे नुकसान होत असल्याचे मत मुख्य प्रशिक्षक मानोलो मार्केझ यांनी बुधवारी व्यक्त केले. इंडियन सुपर लीग (आयएसएल) फुटबॉल स्पर्धेत सहाव्या क्रमांकासह प्ले-ऑफ फेरी गाठण्याच्या शर्यतीत असलेल्या बंगळूर एफसीविरुद्धचा सामना गुरुवारी (ता. 14) फातोर्डा येथील पंडित जवाहरलाल नेहरु स्टेडियमवर खेळला जाईल. त्या पार्श्वभूमीवर मार्केझ बोलत होते.

दरम्यान, एफसी गोवा संघाने पंजाब एफसीविरुद्धच्या मागील लढतीतील 3-3 बरोबरीसह अगोदरच प्ले-ऑफ फेरी निश्चित केली आहे, पण संघ गुण गमावत असून ‘शिल्ड’ जिंकण्याच्या वाटचालीत एफसी गोवा संघ मागे पडत असल्याने प्रशिक्षक मार्केझ चिंतित आहेत. 18 सामन्यांतून 33 गुणांची कमाई केलेला एफसी गोवा संघ सध्या गुणतक्त्यात चौथ्या क्रमांकावर आहे.

Head coach Manolo Marquez
Indian Super League: एफसी गोवा ‘प्ले-ऑफ’पासून एक गुण दूर

दुसरीकडे, बंगळूर एफसीचे सध्या 18 लढतीतून 21 गुण असून ते आठव्या क्रमांकावर आहेत. जमशेदपूर एफसी आणि पंजाब एफसीचेही प्रत्येकी 21 गुण ते अनुक्रमे सहाव्या आणि सातव्या स्थानी आहेत. दोन महिन्यांपूर्वीच संघाची सूत्रे हाती घेतलेल्या जेरार्ड झारागोझा यांच्या मार्गदर्शनाखालील संघाने गोव्यात पूर्ण तीन गुणांची कमाई केल्यास त्यांना सहावा क्रमांक मिळू शकतो.

‘‘प्रतिस्पर्धी संघ नव्या प्रशिक्षकाच्या मार्गदर्शनाखाली बदलत्या शैलीत खेळत आहे. त्यांच्यापाशी राष्ट्रीय संघाचे प्रतिनिधित्व करणारे चांगले खेळाडू आहेत. सामना दोन्ही संघांसाठी खडतर ठरेल हे नक्की,’’ असे मार्केझ म्हणाले.

Head coach Manolo Marquez
Indian Super League: एफसी गोवा आयएसएल ‘शिल्ड’साठी दावेदार

योग्य समतोल साधण्याचा प्रयत्न

‘‘आमचा संघ आता जास्त आक्रमकता दाखवत आहे. त्याचवेळी, आक्रमण आणि बचावात योग्य समतोल राखणे गरजेचे आहे. गुणतक्त्यात निश्चितच आम्हाला वरचा क्रमांक मिळवायचा आहे. मात्र मैदानावरील सातत्यातील अभावाचा फटका संघाला बसत आहे,’’ असे एफसी गोवाचे 55 वर्षीय स्पॅनिश मार्गदर्शक म्हणाले. एफसी गोवा संघ योग्यतेनुसारच गुणतक्त्यातील स्थान मिळवेल याकडे मार्केझ यांनी लक्ष वेधले. आपला संघ आता जास्त गोल स्वीकारत असल्याबद्दलही त्यांनी चिंता व्यक्त केली. “स्पर्धेतील माझा दुसरा महिना आहे. मला त्यांच्याकडून काय हवे आहे, हे खेळाडूंना समजू लागलेय. आमचा क्लब मातब्बर आहे आणि दबावाखाली कसे खेळायचे हे आम्हाला ठाऊक आहे. आम्ही प्रत्येक सामन्यात ते प्रदर्शित करतो.”

- जेरार्ड झारागोझा, प्रशिक्षक बंगळूर एफसी

दैनिक गोमंतकचे सदस्य व्हा

Read Goa news in Marathi and Goa local news on Tourism, Business, Politics, Entertainment, Sports and Goa latest news in Marathi on Dainik Gomantak. Get Goa news live updates on the Dainik Gomantak Mobile app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
var bottom_sticky_ad = googletag .sizeMapping() .addSize([1000, 0], [[728, 90]]) .addSize( [0, 0], [ [320, 50], [300, 50], [320, 100] ] )         .build()
Goa News on Dainik Gomantak
dainikgomantak.esakal.com