पणजी: डिचोली इथे उभारण्यात येत असलेल्या दीनदयाळ उपाध्याय हेल्थकेअर रुग्णालयाला इंडियन ऑइलकडून 10.36 कोटी रुपयांचा निधी प्रदान करण्यात येत आहे. जो रुग्णालयाच्या एकूण खर्चाच्या 50 टक्के आहे. यासाठी इंडियन ऑइल, गोवा साधनसुविधा महामंडळ आणि दीनदयाळ जनसेवा प्रतिष्ठान ट्रस्ट यांच्यात त्रिपक्षीय सामंजस्य करारावर स्वाक्षऱ्या करण्यात आल्या.
यावेळी मुख्यमंत्री डॉ. प्रमोद सावंत, हिमाचल प्रदेशचे राज्यपाल राजेंद्र आर्लेकर, इंडियन ऑइलचे संचालक रंजनकुमार महापात्रा उपस्थित होते.
यावेळी बोलताना मुख्यमंत्री म्हणाले,की अशा प्रकारचे हे पहिलेच रुग्णालय आहे. याचा फायदा गोव्याबरोबर शेजारील सिंधुदुर्ग जिल्ह्यातील नागरिकांनी होईल या महत्वाच्या प्रकल्पात सहभाग नोंदवल्या बद्दल इंडियन ऑइलचे कौतुक आहे.
यावेळी बोलताना रंजनकुमार महापात्र म्हणाले दीनदयाळ जनसेवा प्रतिष्ठान तर्फे या परिसरात शिक्षण, कौशल्य विकास आणि आरोग्य क्षेत्रात केले जाणारे काम उल्लेखनीय आहे. नव्याने उभारण्यात येत असलेल्या रुग्णालयामुळे लोकांच्या आरोग्य सुविधा सुधारण्यासाठी नक्कीच फायदा होईल.
प्रस्तावित मल्टीस्पेशलिटी रुग्णालयाचा लाभ चार लाख स्थानिक लोकांना होईल. गोव्याबरोबरच शेजारील दोडामार्ग आणि सावंतवाडी तालुक्यातील सामाजिक आणि आर्थिकदृष्ट्या दुर्बल 10 टक्के घटकांना मोफत वैद्यकीय उपचार प्रदान केले जातील.प्रस्तावित आरोग्य सेवेमध्ये पॅथॉलॉजी लॅब, फार्मसी, रेडिओग्राफी सुविधा, फिजिओथेरपी सेंटर, पंचकर्म, ऑपरेशन थिएटर, डायलिसिस विभाग आदी सुविधा असणार आहेत. दीड वर्षात हा प्रकल्प पूर्ण होण्याची शक्यता आहे.
यावेळी जीएसआयडीसीचे व्यवस्थापकीय संचालक हरीश अडकोणकर, वल्लभ साळकर, इंडियन ऑईलचे अनिर्बंन घोष आदी उपस्थित होते.
Read Goa news in Marathi and Goa local news on Tourism, Business, Politics, Entertainment, Sports and Goa latest news in Marathi on Dainik Gomantak. Get Goa news live updates on the Dainik Gomantak Mobile app for Android and IOS.