

Indian Culture : बोरी, हिंदूधर्माचा सांभाळ करून जनजागृती कार्य कीर्तनाच्या माध्यमातून कीर्तनकारानी करावे. समाजप्रबोधनाचे मोठे कार्य कीर्तनकार करत आले आहेत.
इज्रायल मध्ये उद्भवलेली स्थिती आपल्या देशावर येऊ नये, यासाठी सर्वांनीच सतर्क राहणे व काही शक्ती देशांविरूध्द करत असलेल्या कारवायाना आळा घालणे हे सर्वांचेच कर्तव्य आहे, असे प्रतिपादन माजी खासदार ॲड. नरेंद्र सावईकर यांनी केले.
देऊळवाडा बोरी येथील श्री नवदुर्गा देवस्थानचे ज्येष्ठ अर्चक स्व. विनायक उर्फ शशिकांत देवारी यांच्या निवासस्थानी आयोजित ४४ व्या कीर्तनकार संमेलनाच्या उद्घाटन समारंभाप्रसंगी ॲड. सावईकर प्रमुख अतिथी म्हणून बोलत होते.
याप्रसंगी सन्माननीय पाहुणे म्हणून उद्योजक जयंत मिरिंगकर, राजेंद्रबुवा मांडेवार, शरदबुवा घाग, मिलिंद देवारी, मेघना देवारी, दिगंबर देवारी व दत्तात्रय उर्फ बाबू देवारी हे व्यासपीठावर होते.
पाहुण्यांच्या हस्ते पारंपरिक समई प्रज्वलित करून कीर्तनकार संमेलनाचे उद्घाटन करण्यात आले. त्यानंतर शेखरबुवा व्यास, किशोर गलांडे, लक्ष्मीप्रसाद पटवारी, रोहिणी व्यास, सरिता गलांडे, शरद तांबे, संजय करताळकर, राजेंद्र मांडेवाल, संदीप माणके, सुहासबुवा वझे, केशव शिवडेकर, मंदार गोखले, दिगंबरबुवा नाईक,
सुहासबुवा सरपोतदार, दामोदर हेदे, रामकृष्ण सुर्लकर, महेश धामस्कर, दिलीप च्यारी, दत्तराज सुर्लकर, लक्ष्मण पालयेकर, नमेश वर्दे बोरकर, संजय गावडे, शैलेश म्हार्दोळकर, दिलीप च्यारी आणि साथी कलाकार व कीर्तनकारांनी अभंग, नाट्यगीते, भावगीते, पोवाडे, भारूड, जोगवा गाऊन संमेलनात रंगत आणली.
शरदबुवा घाग यांनी प्रास्ताविक केले. मिलिंद देवारी यांनी स्वागत केले. राजेंद्रबुवा मांडेवाल यांनी मनोगत यावेळी व्यक्त केले. शिरोडाचे माजी सरपंच संदेश प्रभुदेसाई यावेळी उपस्थित होते.
नवरात्रौत्सवात विविध भागातील कीर्तनकारांना बोलावून कीर्तने सादर करून घेणे हे धर्मजागरणाचे कार्य आहे.
आपल्या देशात हिंदू धर्माचे रक्षण करण्याचे कार्य हे व्हायला हवे. सध्याच्या स्थितीत ही गरज बनली आहे. आपल्या धर्मावर ओढवलेला धोका ओळखून प्रत्येकाने सतर्क राहून आपापले कार्य करावे.
- जयंत मिरिंगकर, उद्योजक
दैनिक गोमंतकचे सदस्य व्हा
शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.
Read Goa news in Marathi and Goa local news on Tourism, Business, Politics, Entertainment, Sports and Goa latest news in Marathi on Dainik Gomantak. Get Goa news live updates on the Dainik Gomantak Mobile app for Android and IOS.