New Covid Variant JN.1: कोरोनाच्या नव्या व्हेरिएंटने वाढवली चिंता, गोव्‍यात सापडला रुग्ण; देशात 324 प्रकरणे

New Covid Variant JN.1: सिंगापूरमध्ये कहर करणाऱ्या कोरोनाचे केपी-१ व केपी-२ व्हेरिएंट भारतात दाखल झाले आहेत.
Covid-19
Covid-19Dainik Gomantak

New Covid Variant JN.1: सिंगापूरमध्ये कहर करणाऱ्या कोरोनाचे केपी-१ व केपी-२ व्हेरिएंट भारतात दाखल झाले आहेत. देशात नोंद असलेल्या विविध राज्यांतील ३२४ प्रकरणांमध्ये गोव्याचा समावेश आहे व गोव्यात त्याचा एक रुग्ण सापडला आहे, अशी माहिती इंडियन कोविड-२ जीनोमिक्स कन्सोर्टीएमने उघड केली आहे.

यासंदर्भात गोमेकॉ इस्पितळातील वरिष्ठ डॉक्टरांशी संपर्क साधण्याचा प्रयत्न केला असता त्यास दुजोरा मिळू शकलेला नाही. केपी-२ रुग्णांची संख्या खूप अधिक आहे. याचे सर्वाधिक रुग्ण महाराष्ट्रात आढळून आले आहेत.

Covid-19
COVID-19 in Goa: मंत्री विश्वजित राणे म्हणतात, 'घाबरू नका, काळजी घेतली तर कोरोनाचे संकट टळेल...'

महाराष्ट्रात आढळलेल्या रुग्णांची संख्या १४८ आहे. दिल्लीत १, गोव्यात १२, गुजरातमध्ये २३, हरियाणात ३, कर्नाटकात ४, मध्य प्रदेशात १, ओडिशामध्ये १७, राजस्थानात २१, यूपीमध्ये ८, उत्तराखंडमध्ये १६ तर पश्चिम बंगालमध्ये ३६ रुग्ण आढळून आलेले आहेत.

Read Goa news in Marathi and Goa local news on Tourism, Business, Politics, Entertainment, Sports and Goa latest news in Marathi on Dainik Gomantak. Get Goa news live updates on the Dainik Gomantak Mobile app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Goa News on Dainik Gomantak
dainikgomantak.esakal.com