Margao News : संविधानाने दिलेले अधिकार प्रत्‍येक महिलेपर्यंत पोचवा! विजया आंब्रे

Margao News : ‘हमारा संविधान, हमारा सन्मान’ योजनेअंतर्गत मडगावात शिबिर
Margao
Margao Dainik Gomantak

Margao News :

मडगाव, भारतीय संविधानाने महिलांना अधिकार प्राप्त करून दिले आहेत. त्यामुळेच चूल आणि मूल ही जुनी विचारसरणी बाजूला सारून महिला पुढे येत आहेत.

देशाचा विकास तेथील महिलांच्या प्रगतीवर अवलंबून असतो. त्‍यामुळे महिला सबळ झाल्या पाहिजेत. त्‍यासाठी संविधानातील अधिकारांची माहिती महिलांपर्यंत पोचवणे आवश्यक आहे, असे प्रतिपादन राज्य कायदा सेवा प्राधिकरण सदस्य सचिव विजया आंब्रे यांनी केले.

भारतीय प्रजासत्ताकाला ७५ वर्षे पूर्ण झाल्याच्‍या निमित्ताने सेंट्रल ब्युरो ऑफ कम्युनिकेशनकडून आज मडगावच्या रवींद्र भवनात आयोजिलेल्या ‘हमारा संविधान, हमारा सन्मान’ या मोहिमेअंतर्गत घेतलेल्या शिबिरात आंब्रे बोलत होत्या.

यावेळी प्रशासकीय अधिकारी दीपाली नाईक, अनिशा सिमॉईश, ‘पीआयबी’चे उपसंचालक गौतम कुमार आणि मान्‍यवर उपस्थित होते.

महिलांवरील घरगुती हिंसा आणि अत्याचार प्रकरणांत प्राधिकरण कायदेशीर मदत पुरवते. जनजागृतीसाठी अनेक शिबिरेही घेतली आहेत, असे आंब्रे यांनी सांगितले. यावेळी दीपाली नाईक यांनीही मनोगत व्यक्त केले.

Margao
Goa Comunidade: माजी ॲटर्नी परेरांवर एफआयआर नोंदवा

पीडित मुलांना कायदेशीर मार्गदर्शन

कोणत्याही मुलाला न्यायालयाची पायरी चढायला आवडणार नाही; पण बऱ्याचदा त्यांच्यावर ती वेळ येते. नकळत केलेल्या गुन्ह्यांसाठी संशयित म्हणून किंवा अन्यायाला बळी पडलेली पीडिता म्हणून त्यांना न्यायालयात दाद मागावी लागते.

अशा मुलांना कायद्याची माहिती देणे, त्यांना कायदेशीर सल्ला प्राप्त करून देणे आणि न्यायालयीन लढा लढण्यासाठी वकील नेमून देण्याचे काम प्राधिकरण करते, असे आंब्रे यांनी सांगितले.

Read Goa news in Marathi and Goa local news on Tourism, Business, Politics, Entertainment, Sports and Goa latest news in Marathi on Dainik Gomantak. Get Goa news live updates on the Dainik Gomantak Mobile app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Goa News on Dainik Gomantak
dainikgomantak.esakal.com