Goa-Maharashtra Coastline Security: सागरी सुरक्षेसाठी...! गोवा-महाराष्ट्र किनारपट्टीवर भारतीय तटरक्षक दलाचा सराव

Indian Coast Guard: या सरावामुळे घुसखोरी, तस्करी, चाचेगिरी आणि नैसर्गिक आपत्तींसारख्या सागरी सुरक्षा धोक्यांवर आमची सामूहिक प्रतिक्रिया तपासण्यात आणि सुधारण्यात मदत होईल.
Indian Coast Guard
Indian Coast GuardIndian Coast Guard X Handle
Published on
Updated on

Indian Coast Guard

पणजी: भारतीय तटरक्षक दलाने गोवा आणि महाराष्ट्राच्या किनारपट्टीवर इतर एजन्सींसोबत संयुक्त सराव केला. बुधवारपासून सुरु झालेल्या दोन दिवसीय सागर कवच तटीय सुरक्षा सरावाचे देशाच्या सागरी हितांचे रक्षण करणे घेणे उद्दिष्ट होते.

तटरक्षक दल भारतीय नौदल, सीमाशुल्क, तटीय पोलीस, केंद्रीय औद्योगिक सुरक्षा दल, मुरगाव बंदर प्राधिकरण आणि गोवा सरकारचे मत्स्यव्यवसाय आणि बंदरे विभाग यांच्या समन्वयाने हा सराव करण्यात आला.

'देशाची किनारपट्टी आणि सागरी सुरक्षा मजबूत करणे हा तटीय सुरक्षा सरावाचा उद्देश आहे. या सरावामुळे घुसखोरी, तस्करी, चाचेगिरी आणि नैसर्गिक आपत्तींसारख्या सागरी सुरक्षा धोक्यांवर आमची सामूहिक प्रतिक्रिया तपासण्यात आणि सुधारण्यात मदत होईल.'

'हा संयुक्त सराव आमच्या किनारपट्टीच्या सुरक्षेसाठी आणि देशाच्या सागरी हितसंबंधांबद्दलची आमची वचनबद्धता प्रतिबिंबित करतो,' असे तटरक्षक दलाच्या प्रसिद्धीपत्रकात म्हटले आहे.

Indian Coast Guard
Mumbai Goa Highway: परशुराम घाटात संरक्षक भिंत कोसळली, मुंबई-गोवा महामार्गावर एकेरी वाहतूक

गुजरात दमण-दीव येथेही सराव

या सरावादरम्यान, SOPs चे पुनर्प्रमाणीकरण करणे, हल्ले रोखणे, घुसखोरांना रोखणे, एजन्सींमधील समन्वय विकसित करणे आणि दहशतवादी धमक्याविरोधात तयारी यासह विविध सराव करण्यात आले.

दैनिक गोमंतकचे सदस्य व्हा

Read Goa news in Marathi and Goa local news on Tourism, Business, Politics, Entertainment, Sports and Goa latest news in Marathi on Dainik Gomantak. Get Goa news live updates on the Dainik Gomantak Mobile app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
var bottom_sticky_ad = googletag .sizeMapping() .addSize([1000, 0], [[728, 90]]) .addSize( [0, 0], [ [320, 50], [300, 50], [320, 100] ] )         .build()
Goa News on Dainik Gomantak
dainikgomantak.esakal.com