Goa Recruitment: नोकर भरतीला ब्रेक नाही! पुढचे दोन महिने प्रक्रिया सुरुच राहणार; सावंत सरकार ठाम

Government Recruitment Goa: सरकारी कर्मचारी भरतीची प्रक्रिया पुढील दोन महिने सुरूच असेल. तसेच राज्य सरकारने तिसरा जिल्हा तयार करण्याची प्रक्रियाही सुरू केली आहे.
Goa Recruitment: नोकर भरतीला ब्रेक नाही! पुढचे दोन महिने प्रक्रिया सुरुच राहणार; सावंत सरकार ठाम
Goa CM Pramod SawantDainik Gomantak
Published on
Updated on

पणजी: सरकारी कर्मचारी भरतीची प्रक्रिया पुढील दोन महिने सुरूच असेल. तसेच राज्य सरकारने तिसरा जिल्हा तयार करण्याची प्रक्रियाही सुरू केली आहे. लवकरच मंत्रिमंडळ या निर्णयावर शिक्कामोर्तब करेल, अशी माहिती मुख्यमंत्री डॉ. प्रमोद सावंत यांनी बुधवारी (8 जानेवारी) मंत्रिमंडळ बैठकीनंतर दिली.

सरकारी नोकरी पात्र ठरणाऱ्यांची नियुक्ती एप्रिलनंतरच केली जाईल. वित्त खात्‍याने काल जारी केलेल्या परिपत्रकात नव्या पदनिर्मितीवर बंदी घातली होती, त्याचा अर्थ सरकारी नोकरभरती बंद राहील असा घेण्यात आला होता, असे मुख्यमंत्री म्‍हणाले.

खाण खात्‍य‍ात १५ कर्मचारी नेमणार

सरकारने खनिज ई-लिलाव प्रक्रिया सुटसुटीत करण्यासाठी खनिज धोरणात दुरुस्तीचा निर्णय घेतला आहे. शिवाय खाणपट्टा लिलाव आणि गौण खनिज परवाने प्रक्रिया गतिमान करण्यासाठी खाण खात्‍य‍ात १५ कर्मचारी नेमण्यास मंजुरी दिली आहे. उपसंचालक दर्जाची दोन पदे कंत्राटी पद्धतीवर भरण्‍यास मंत्रिमंडळाने मंजुरी दिली आहे. पशुपालन व पशुसंवर्धन महाविद्यालय प्राचार्यपदी डी. आंतोनियो यांची कंत्राटी पद्धतीने नियुक्‍ती करण्‍यात आली आहे. तसेच पोलिस खात्‍यात सहा नवीन अधीक्षकपदे तयार करण्यात येणार आहेत.

‘टूलकिट’द्वारे गोव्‍याची बदनामी

जगप्रसिद्ध पर्यटनस्‍थळ असलेल्‍या गोव्‍याची ‘टूलकिट’द्वारे बदनामी होत आहे. त्‍यामुळे त्‍याच्‍या मुळाशी जाण्‍याची मागणी मंत्रिमंडळ बैठकीत करण्‍यात आली. गोव्‍याची (Goa) आणि सरकारची बदनामी करणाऱ्या ‘पेड एन्‍फ्‍लूएन्‍सर’ना कोणाचा पाठिंबा आहे, हे शोधून काढले पाहिजे, अशी मागणी मंत्र्यांनी मुख्‍यमंत्र्यांकडे केली.

दैनिक गोमंतकचे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Goa news in Marathi and Goa local news on Tourism, Business, Politics, Entertainment, Sports and Goa latest news in Marathi on Dainik Gomantak. Get Goa news live updates on the Dainik Gomantak Mobile app for Android and IOS.

Related Stories

Goa maritime development project
CM Pramod Sawant RGP Crisis Statement
Goa Monsoon Preparedness
cm pramod swant
Goa News in Marathi - Dainik Gomantak
dainikgomantak.esakal.com