Goa Police: कर्कश आवाजाच्या दुचाकींवर पोलिसांचा 'अंकुश', फोंड्यात तिघांवर गुन्हा दाखल

Ponda Police Action on Loud Bikes: शहरात वाढत्या ध्वनी प्रदूषणावर नियंत्रण आणण्यासाठी वाहतूक पोलिसांनी कडक भूमिका घेतली आहे.
Goa Police
Goa PoliceDainik Gomantak
Published on
Updated on

फोंडा: शहरात वाढत्या ध्वनी प्रदूषणावर नियंत्रण आणण्यासाठी वाहतूक पोलिसांनी कडक भूमिका घेतली असून, कर्कश आवाज करत रस्त्यावर सुसाट धावणाऱ्या दुचाकींवर कारवाईचा बडगा उगारला आहे.

फोंडा शहरात कर्कश आवाज करणाऱ्या दुचाकींवर नियंत्रण ठेवण्यासाठी वाहतूक पोलिसांनी विशेष मोहीम राबवली. फोंडा वाहतूक पोलीस निरीक्षक कृष्णा सिनारी यांच्या मार्गदर्शनाखाली या मोहिमेत ३ दुचाकी मालकांविरोधात गुन्हा दाखल केला आहे.

फोंड्यात गजबजलेल्या ठिकाणी वाहतूक पोलिसांनी विशेष तपासणी मोहीम राबवली आहे. मॉडिफाइड सायलेन्सर बसवून मोठ्या आवाजात दुचाकी चालवणाऱ्या वाहनधारकांवर पोलिसांकडून कारवाई सुरू आहे.

Goa Police
Goa TCP Fee: ‘टीसीपी’ने जुने शुल्क आकारल्याची 46 प्रकरणे उघड; याचिकादारास पडताळणीचे खंडपीठाचे निर्देश

वाहतूक पोलिसांच्या माहितीनुसार, अशा दुचाकींच्या मालकांना आधीच नियमांचे पालन करण्याच्या सूचना देण्यात आल्या होत्या. मात्र, नियमांकडे दुर्लक्ष करणाऱ्या वाहनधारकांविरोधात आता कठोर कारवाई सुरू करण्यात आली आहे.

वाहतूक पोलिसांनी स्पष्ट केलं आहे की, अशा प्रकारच्या कारवाया भविष्यातही सुरूच राहतील. आपल्या वाहनांचे सायलेन्सर नियमांनुसार ठेवावेत व इतर नागरिकांना त्रास होणार नाही, याची दक्षता घ्यावी.

दैनिक गोमंतकचे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Goa news in Marathi and Goa local news on Tourism, Business, Politics, Entertainment, Sports and Goa latest news in Marathi on Dainik Gomantak. Get Goa news live updates on the Dainik Gomantak Mobile app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Goa News on Dainik Gomantak
dainikgomantak.esakal.com