Margao Muncipality: 'देव मलाच पावला' ; नवनिर्वाचित नगराध्यक्ष घन:श्‍याम शिरोडकर

Margao Muncipality: 'देव मलाच पावला' ; नवनिर्वाचित नगराध्यक्ष घन:श्‍याम शिरोडकर
Published on
Updated on

मडगाव: शुक्रवार हा देवी महालक्ष्मीचा वार आहे. आजच माझा विजय झाला. त्यामुळे देवाचा खऱ्या अर्थाने मलाच प्रसाद दिला. देव मलाच पावला, अशी प्रतिक्रिया नव्याने निवडून आलेले नगराध्यक्ष घनःश्याम शिरोडकर (Ghanshyam Shirodkar) यांनी व्यक्त केली.

मला भाजपमध्ये प्रवेश करण्यासाठी देवाने प्रसाद दिला, हे आमदार दिगंबर कामत यांचे वक्तव्य सध्या नेटिझन्सच्या टीकेचा विषय बनलेला असताना आज नवनिर्वाचित नगराध्यक्ष घन:श्‍याम शिरोडकर यांनी ही प्रतिक्रिया व्यक्त केली. (Margao Muncipality Chairperson Election)

Margao Muncipality: 'देव मलाच पावला' ; नवनिर्वाचित नगराध्यक्ष घन:श्‍याम शिरोडकर
Coastal Clean-up: गोव्यात किनारपट्टी स्वच्छता अभियानाला सुरूवात; राज्यपाल, मुख्यमंत्री, मंत्री सहभागी

सोनसोडो ही मडगावची गेल्या अनेक वर्षांची समस्या असून ती सोडविण्याला आपले सर्वोच्च प्राधान्य राहील, असे शिरोडकर यांनी सांगितले. 15 वर्षांनंतर या पदाची पुन्हा सूत्रे हाती घेतल्यानंतर ते पत्रकारांशी बोलत होते.

मी जरी अपक्ष असलो तरी माझ्या पाठीमागे राहाणारे नगरसेवक आणि आमदार तथा गोवा फॉरवर्डचे सर्वेसर्वा विजय सरदेसाई यांचे आभार मानले. मला मडगाव पालिका नवी नाही. त्यामुळे येथील कामाचा निपटारा लीलया करू. कामचुकारांची हयगय केली जाणार नाही, असे त्यांनी निक्षून सांगितले.

गेल्या काही वर्षांत फातोर्डात अनेक कामे झाली; पण मडगावात तशी झाली नाहीत. त्याचे परिणाम आता जाणवत आहेत. पीछाडीवर गेलेल्या मडगावला गतवैभव देण्याचे कामही करावे लागणार असल्याचे त्यांनी सांगितले.

Margao Muncipality: 'देव मलाच पावला' ; नवनिर्वाचित नगराध्यक्ष घन:श्‍याम शिरोडकर
Old Goa: कोण म्हणतं शेती परवडत नाही; एकात्मिक शेती फायद्याची! 

मला 20 मते मिळणार होती पण...

पिंपळकट्ट्यावर आल्यावर घन:श्याम म्हणाले की, मला विजयाची पूर्ण खात्री होती. एवढेच नव्हे, तर मला 20 मते मिळणार होती. त्यातील पाचाचे काय झाले कळले नाही. कदाचित काल मुख्यमंत्री आल्यानंतर झालेल्या घडामोडींचा तो परिणाम असावा; पण काहीही हरकत नाही. काही वर्षांनी पुन्हा नगरपालिकेत आलो ते मडगावचे चांगले करण्यासाठी एवढी खात्री बाळगा, असे शिरोडकर म्हणाले.

दैनिक गोमंतकचे सदस्य व्हा

Read Goa news in Marathi and Goa local news on Tourism, Business, Politics, Entertainment, Sports and Goa latest news in Marathi on Dainik Gomantak. Get Goa news live updates on the Dainik Gomantak Mobile app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
var bottom_sticky_ad = googletag .sizeMapping() .addSize([1000, 0], [[728, 90]]) .addSize( [0, 0], [ [320, 50], [300, 50], [320, 100] ] )         .build()
Goa News on Dainik Gomantak
dainikgomantak.esakal.com