Independence Day : गोव्यात सर्वत्र तिरंगा माहोल; स्वातंत्र्यदिन उत्साहात साजरा

‘अमृत महोत्सवा’चा उत्साह; ठिकठिकाणी मशालयात्रा, रॅलींचं आयोजन
Independence Day Celebration in Goa
Independence Day Celebration in Goa
Published on
Updated on

Independence Day : देशाच्या ‘आझादी का अमृत महोत्सव’ निमित्ताने राज्यभर विविध कार्यक्रम होत असून केंद्र आणि राज्य सरकारने राबवलेल्या ‘हर घर तिरंगा’ अभियानामुळे राष्ट्रभक्ती आणि चैतन्याचे वातावरण पसरले आहे. नागरिकांनी घरोघरी आपला राष्ट्रीय ध्वज तिरंगा घरांवर डौलाने फडकविल्याचा दिसत आहे.

राज्य सरकारच्या वतीने तिरंगा रॅली, प्रभात फेरी, मशाल मिरवणूक, मुकयात्रा, मोटरसायकल रॅली असे अनेक कार्यक्रम घेण्यात आले. स्वातंत्र्य दिनाच्या दिवशीही भरगच्च कार्यक्रमांचे आयोजन करण्यात आले आहे. यामुळे अमृतकाळात राज्यभर देशभक्तीला उधाण आल्याचे उत्साहाचे चित्र दिसत आहे.

15 ऑगस्ट, स्वातंत्र्यदिनाच्या निमित्ताने राज्यभर ध्वजारोहण, ध्वजवंदनाचा कार्यक्रम आयोजित करण्यात आले आहेत. बाराही तालुक्यांच्या ठिकाणी मंत्री, आमदार यांच्या हस्ते ध्वजारोहण करण्यात आले आहे. मुख्य शासकीय सोहळा जुन्या सचिवालयासमोर मुख्यमंत्र्यांच्या उपस्थितीत सकाळी 9 वाजता पार पडला. तत्पूर्वी 8.30 वाजता मुख्यमंत्री प्रमोद सावंत यांनी शासकीय निवासस्थानी ध्वजारोहण केले. तर राजभवनावर सकाळी 8.30 वा. राज्यपाल पी.एस.श्रीधरन पिल्लई यांनी ध्वजारोहण करून मानवंदना दिली.

Independence Day Celebration in Goa
गावातील शाळांना स्वातंत्र्यसैनिकांची नावं देणार; मुख्यमंत्री सावंत यांची मोठी घोषणा

डोक्‍यावर हेल्‍मेट नाही; पण दुचाकीवर तिरंगा!

‘ध्वज आणि मी’ हे समीकरण दुचाकींवरही पाहायला मिळाले. अनेक तरुणांनी डोक्‍यावर हेल्‍मेट घातले नव्‍हते; पण गाडीला भला मोठा तिरंगा लावला होता. असे चित्र गेल्‍या दोन दिवसांपासून महामार्गांवरही दिसत आहे.

मूक रॅलीत मंत्र्यांसह लोकप्रतिनिधी सहभागी

हुतात्मा स्मरण दिनानिमित्त राजधानी पणजीत मूकरॅली काढण्यात आली. यात मुख्यमंत्री डॉ. प्रमोद सावंत, मंत्री रोहन खंवटे, मंत्री बाबूश मोन्सेरात, महापौर रोहित मोन्सेरात, आ.चंद्रकांत शेट्ये, भाजपचे प्रदेशाध्यक्ष सदानंद शेट तानावडे आदींनी सहभाग घेतला.

राज्यातील सर्वच शहरांत नागरिकांनी उत्स्फूर्तपणे तिरंगा ध्वज घराबाहेर फडकाविला. त्याशिवाय राजधानीतील सरकारी कार्यालयांवर विद्युत रोषणाई करण्यात आली आहे. भाजपच्या मुख्यालयावरही रोषणाई करण्यात आली असून, तिरंग्याची सजावटही करण्यात आली आहे. याशिवाय अल्तिनो येथील दूरदर्शनच्या टॉवरवर करण्यात आलेली विद्युत रोषणाई लक्ष वेधून घेत आहे.

दैनिक गोमंतकचे सदस्य व्हा

Read Goa news in Marathi and Goa local news on Tourism, Business, Politics, Entertainment, Sports and Goa latest news in Marathi on Dainik Gomantak. Get Goa news live updates on the Dainik Gomantak Mobile app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
var bottom_sticky_ad = googletag .sizeMapping() .addSize([1000, 0], [[728, 90]]) .addSize( [0, 0], [ [320, 50], [300, 50], [320, 100] ] )         .build()
Goa News on Dainik Gomantak
dainikgomantak.esakal.com