Construction In Goa: बंद ठेवलेले बांधकाम सुरू करण्‍यासाठी कोटींचा प्रस्‍ताव

Construction In Goa: सायबर पोलिसांकडून ‘त्या’ ऑडिओची चौकशी
Carlos Ferreira
Carlos FerreiraDainik Gomantak
Published on
Updated on

Construction In Goa:

पोंबुर्फा पंचायत क्षेत्रातील साल्वादोर द मुंद येथील एका बांधकाम प्रकल्पाविरुद्ध याचिका उच्च न्यायालयात दाखल झाल्याने ते बंद ठेवण्यात आले आहे. या प्रकल्पाविषयी तोडगा काढण्यासाठी कोट्यवधींच्‍या प्रस्तावाचा ऑडिओ व्हायरल झाल्यानंतर यासंदर्भात आपल्या नावाची बदनामी झाल्याची बाब ॲड. कार्लुस फेरेरा यांनी वरिष्ठ पोलिस अधिकाऱ्यांच्या निदर्शनास आणून दिली. याप्रकरणाची दखल घेऊन सायबर कक्षाच्या पोलिसांनी चौकशी सुरू केली आहे.

बांधकाम प्रकल्पाविरुद्धच्या याचिका उच्च न्यायालयात सुनावणीस आल्या तेव्हा प्रकल्पाचे मालक तरुण ताहिलानी यांनी स्वतःच हे बांधकाम तूर्त बंद ठेवण्याची हमी दिली आहे. हे प्रकरण न्यायप्रविष्ट असताना न्यायालयाबाहेर मिटवण्यासाठी कोट्यवधींची मागणी करणारा ऑडिओ गेल्या फेब्रुवारी महिन्यात व्हायरला झाला होता.

या ऑडिओमध्ये कार्लुस फेरेरा यांच्या नावासह या प्रकरणाशी संबंधित खात्याचाही उल्लेख आहे. त्यामुळे कार्लुस यांनी या ऑडिओची माहिती मिळताच वरिष्ठ पोलिस अधिकाऱ्यांना भेटून सविस्तर लेखी माहिती दिली आहे. त्याची दखल घेऊनच वरिष्ठ पोलिस अधिकाऱ्यांनी हे प्रकरण सायबर कक्षाकडे चौकशीसाठी वर्ग केले आहे.

Carlos Ferreira
Mhadei River: म्‍हादईच्‍या मुद्यावरून विरोधकांनी फटकारले

काय आहे प्रकरण?

  • साल्वादोर द मुंद येथील या प्रकल्पासंदर्भात तोडगा काढण्यासाठी मधु व क्रिस्पिन यांच्यात झालेल्या संभाषणाचा ऑडिओ फेब्रुवारीच्या दुसऱ्या आठवड्यात व्हायरल झाला होता.

  • या संभाषणामधून क्रिस्पिन हा हे प्रकरण सोडवू शकतो, ही गोष्ट पटवून देण्याचा प्रयत्न करत असल्याचे उघड होत आहे.

  • त्यासाठी कोट्यवधीची रक्कम मोजावी लागेल, असे बोलणेही समोर आले आहे. या संभाषणावेळी त्यामध्ये कार्लुस तसेच काही महनीय व्यक्तींचा तो उल्लेख करत असल्याचे त्यात ऐकू येत आहे.

कार्लुस कोण?

यासंदर्भात हळदोणेचे आमदार ॲड. कार्लुस फेरेरा यांच्याशी संपर्क साधला असता ते म्हणाले, याबाबत सायबर कक्षाकडे तक्रार केली नाही.

मात्र, वरिष्ठ पोलिस अधिकाऱ्यांच्‍या निदर्शनास आणून दिले आहे. या संभाषणाचा ऑडिओ ऐकल्यानंतर त्यामध्ये फक्त कार्लुस असा उल्लेख असून, पूर्ण नाव घेण्यात आलेले नाही. त्यामुळे हा कार्लुस कोण, हे आपल्यालाही माहीत नाही.

दैनिक गोमंतकचे सदस्य व्हा

Read Goa news in Marathi and Goa local news on Tourism, Business, Politics, Entertainment, Sports and Goa latest news in Marathi on Dainik Gomantak. Get Goa news live updates on the Dainik Gomantak Mobile app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
var bottom_sticky_ad = googletag .sizeMapping() .addSize([1000, 0], [[728, 90]]) .addSize( [0, 0], [ [320, 50], [300, 50], [320, 100] ] )         .build()
Goa News on Dainik Gomantak
dainikgomantak.esakal.com