Goa Super Blue Moon 2023:
Goa Super Blue Moon 2023:Dainik Gomantak

Goa Super Blue Moon 2023: गोव्यात गुरूवारी पाहता येणार दुर्मिळ सुपर ब्लू मून; यानंतर थेट 2026 मध्ये दिसणार...

या वर्षातला अखेरचा सुपरमून; 14 टक्के अधिक तेजस्वी दिसणार
Published on

Goa Super Blue Moon 2023: गोव्यात गुरूवारी, ३१ ऑगस्ट रोजी अत्यंत दुर्मिळ दिसणारा असा सर्वात मोठा सुपर ब्लू मून पाहता येणार आहे. ही एक दुर्मिळ खगोलीय घटना असते. यात चंद्र हा पृथ्वीचा उपग्रह त्या वर्षातील इतर पौर्णिमेच्या तुलनेत 14 टक्के अधिक मोठा आणि तेजस्वी दिसू शकेल.

या वर्षी जुलै आणि ऑगस्टमध्ये एकूण तीन सुपरमून झाले आहेत. गुरुवारी रात्रीचा पूर्ण चंद्र ऑगस्ट महिन्यताील दुसरा सुपरमून असणार आहे. या वर्षातील म्हणजेच 2023 च्या सुपरमूनच्या मालिकेतील हा शेवटचा सुपरमून असेल.

Goa Super Blue Moon 2023:
Goa Crime: दोन खूनांनी गोवा हादरला; डिचोलीत नग्नावस्थेत तरूणाचा मृतदेह, माडेलमध्ये कामगाराचा डोक्यात दगड घालून खून

या घटनेतील नाविण्य हेच आहे की, यात चंद्र हा वर्षातील सर्वात मोठा आणि सर्वात तेजस्वी दिसणार आहे.

दरम्यान, उत्तर गोव्यातील खगोल प्रेमींसाठी पणजी येथील सार्वजनिक खगोलशास्त्रीय वेधशाळा आणि विद्या प्रबोधिनी हायस्कूल पर्वरी येथे गुरूवारी एक निरीक्षण सत्र आयोजित केले जाणार आहे.

या कार्यक्रमाचा एक भाग म्हणून पणजी वेधशाळेत संध्याकाळी 7.30 वाजता खगोलीय घटनांच्या गतीशीलतेवर विशेष कार्यक्रम होणार आहे. दक्षिण गोव्यासाठी हे निरीक्षण रवींद्र भवन मडगाव येथे असणार आहे. तिन्ही ठिकाणी हा कार्यक्रम सायंकाळी 7 ते रात्री 9 या वेळेत सर्वसामान्यांसाठी खुला व विनामूल्य असेल.

Goa Super Blue Moon 2023:
Goa Tourism News: 'या' तारखेपर्यंत नोंदणी करा! नाहीतर, वीज-पाणी कनेक्शन तोडणार... गोवा पर्यटन विभागाचा इशारा

ब्लू मून म्हणजे काय?

एकाच महिन्यात दोन पौर्णिमा आल्यास दुसऱ्या पौर्णिमेच्या चंद्राला ब्लू मून म्हटले जाते. दर दोन किंवा तीन वर्षानंतर हा दुर्मिळ योग अनुभवता येतो. ब्लू मून म्हणजे चंद्र निळा दिसत नाही. तथापि, तो मोठा आणि अधिक प्रकाशमान मात्र दिसतो.

ब्लू मून दिवशी चंद्र हा पृथ्वीपासून सर्वात जवळ असतो. त्यामुळे तो मोठा दिसतो. 31 ऑगस्टनंतर आता थेट 31 मे 2026 रोजी असा सुपर ब्लू मून पुन्हा पाहायला मिळणार आहे.

Read Goa news in Marathi and Goa local news on Tourism, Business, Politics, Entertainment, Sports and Goa latest news in Marathi on Dainik Gomantak. Get Goa news live updates on the Dainik Gomantak Mobile app for Android and IOS.

var bottom_sticky_ad = googletag .sizeMapping() .addSize([1000, 0], [[728, 90]]) .addSize( [0, 0], [ [320, 50], [300, 50], [320, 100] ] )         .build()
Goa News on Dainik Gomantak
dainikgomantak.esakal.com