निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर ताळगावात पोलिस गस्तीमध्ये वाढ

झोपडपट्टी वस्ती असलेल्या ठिकाणी निमलष्करी दलाचे जवान 24 तास गस्तीवर ठेवण्यात आले आहे.
Increase in police patrolling in Talgaon in the light of coming goa election
Increase in police patrolling in Talgaon in the light of coming goa election Dainik Gomantak
Published on: 
Updated on: 

पणजी: राज्यातील विधानसभा निवडणुकीसाठीचे मतदान एक आठवड्यावर येऊन ठेपले आहे त्यामुळे प्रचाराचे वातावरण तापू लागले आहे. ताळगाव मतदारसंघातील कामराभाट येथे दोन पक्षाच्या समर्थकांमध्ये झालेला वाद लक्षात घेऊन निवडणूक अधिकाऱ्यांनी ताळगावमध्ये पोलिस गस्त वाढवली आहे. झोपडपट्टी वस्ती असलेल्या ठिकाणी निमलष्करी दलाचे जवान 24 तास गस्तीवर घालण्यात आले आहे. या भागातील परिस्थितीवर पणजीचे (Panjim) पोलिसही नियंत्रण ठेवून आहेत. (Increase in police patrolling in Talgaon in the light of coming goa election)

Increase in police patrolling in Talgaon in the light of coming goa election
गोव्यात कॉंग्रेसची सत्ता आल्यास महिलांच्या रक्षणासाठी प्रथम प्राधान्य: प्रियंका गांधी

तिसवाडी तालुक्यातील ताळगाव व सांताक्रुझ मतदारसंघातील काही भागात झोपडपट्टी वस्ती आहे. त्या भागात असलेली मते मिळवण्यासाठी राजकीय पक्षाच्या नेत्यांकडून तसेच कार्यकर्त्यांकडून आटोकाट प्रयत्न होत असतात. ताळगावतील कामराभाट तर सांताक्रुझमधील चिंबल व मेरशी परिसर येथे मोठ्या प्रमाणात बिगर गोमंतकिय गेली कित्येक वर्षे स्थायिक आहेत व ते मतदानाचा हक्क बजावत आहेत. त्यामुळे या मतदारांना राजकीय नेत्यांकडून अनेक आमिषे दाखविली जातात. पैशांची उलाढाल या भागात निवडणुकीच्या काळात होते. त्यामुळे या भागात जाणाऱ्या जंक्शनवर निमलष्करी दलाची पथके तैनात केली आहेत.

ज्या मतदारसंघात प्रचारावेळी उमेदवारांच्या समर्थकांमध्ये बाचाबाची तसेच कायदा सुव्यवस्था बिघडण्याची शक्यता आहे अशा मतदान केंद्राची माहिती पोलिस खात्यामार्फत जिल्हाधिकाऱ्यांकडे देण्यात आली आहे. या माहितीच्या आधारे लवकरच मतदारसंघातील संवेदनशील तसेच अतिसंवेदनशील मतदान केंद्रे निश्‍चित केली जाणार आहेत. , अशी माहिती जिल्हाधिकारी कार्यालयातील अधिकाऱ्यांनी दिली.

Increase in police patrolling in Talgaon in the light of coming goa election
देशात गोवा राज्य बेरोजगारीमध्ये दुसऱ्या क्रमांकावर: प्रियांका गांधी

रात्रीच्यावेळीही जवानांची वर्णी

ताळगाव व सांताक्रुझ हे दोन्ही मतदारसंघ संवेदनशील जाहीर होण्याची शक्यता असल्याने रात्रीच्यावेळी निमलष्करी दलाच्या जवानांची अधिक वर्णी लावण्यात आली आहे.

निमलष्करी दलाच्या 30 कंपन्या गोव्यात

या निवडणुकीसाठी (Goa Assembly Election) पोलिस खात्यातील सुमारे पाच हजाराहून अधिक कर्मचाऱ्यांची नियुक्ती करण्यात आली आहे. सुमारे 55 निमलष्करी दलाच्या कंपन्या केंद्रीय निवडणूक आयोगाकडे (Goa Election Commission) मागण्यात आल्या होत्या. त्यापैकी 30 कंपन्या गोव्यात पोहचल्या आहेत. उर्वरित कंपन्या या मतदानाच्या दोन दिवस अगोदर दाखल होण्याची शक्यता आहे.

दैनिक गोमंतकचे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Goa news in Marathi and Goa local news on Tourism, Business, Politics, Entertainment, Sports and Goa latest news in Marathi on Dainik Gomantak. Get Goa news live updates on the Dainik Gomantak Mobile app for Android and IOS.

Related Stories

Goa High Court SIR hearing
Cooperative societies financial transparency
Goa River Pollution
Shivaji Maharaj Statue Headland Sada
Goa News in Marathi - Dainik Gomantak
dainikgomantak.esakal.com