Margao : कोविडनंतर ‘सेकंड होम’साठी गोव्‍यालाच पसंती

गृहविक्रीत वाढ : कोविडनंतर रिअल इस्‍टेट उद्योगात सकारात्‍मक बदल, कोटींचे व्यवहार
Real Estate Entrepreneur
Real Estate EntrepreneurGomantak Digital Team

Margao : कोविडच्‍या काळात मंदीत गेलेल्‍या गोव्‍यातील रिअल इस्‍टेट उद्योगाने आता पुन्‍हा महत्त्व आले असून महागड्या आणि आलिशान घरांसाठी गोव्‍यात मागणी वाढली आहे. देशभरातील लोकांसाठी ‘सेकंड होम’ विकत घेण्‍यासाठी गोवा हे पहिल्‍या पसंतीचे राज्‍य ठरले आहे. एक ते तीन कोटी रुपये देऊन गोव्‍यातील ही घरे विकत घेतली जात आहेत. एकूणच गृहविक्रीत वाढ झाली आहे.

हाउसिंग डॉट कॉम या संकेतस्‍थळाने केलेल्‍या संशोधनातून ही बाब उघड झाली आहे. या संकेतस्‍थळाने लोकांना प्रश्न विचारून हा सर्वे केला होता. मुंबई आणि बंगळूर येथील लोक गोव्‍यात घरे विकत घेण्‍यासाठी पुढे येत असून दिल्‍लीतील बांधकाम व्‍यावसायिकांनी गोव्‍यात रिअल इस्‍टेटमध्‍ये मोठ्या प्रमाणावर पैसा गुंतविला आहे.

Real Estate Entrepreneur
Margao Crime: दवर्ली पंच सदस्‍यावर सुरीहल्‍ला; एकाला अटक, वादाला धार्मिक रंग

आसगाव, अंजुणा, पर्वरी व शिवोली या भागातील आलिशान घरांना लोकांची अधिक मागणी आहे. पणजी, वास्‍को, फोंडा आणि मडगाव येथेही घरे घेणे पसंत करतात. उत्तर गोव्‍यात मोठ्या बंगल्‍यांना अधिक मागणी आहे. या सर्व घरांची किंमत एक कोटीपेक्षा जास्‍त आहे. हाऊसिंग डॉट कॉमचे राष्‍ट्रीय व्‍यावसायिक प्रमुख अमित मसालदन यांच्‍या मताप्रमाणे, देशातील इतर राज्‍याच्‍या तुलनेत गोव्‍यात आपले सेकंद होम खरेदी करण्‍यास पसंती देतात.

मोपा येथे मनोहर आंतरराष्‍ट्रीय विमानतळ परिसरालाही आता मागणी येण्‍याची शक्‍यता असल्‍याने कित्‍येक बड्या रिअल इस्‍टेट उद्योजकांनी मोपात जमिनी विकत घेण्‍यास सुरुवात केली आहे. यात उत्तर भारतातील व्‍यावसायिकांचा अधिक भरणा आहे.

Real Estate Entrepreneur
Margao: मडगावचे ख्रिस्ती हॉस्पिटल

गोव्‍यात आपण चांगल्‍याच प्रकारे श्‍वास घेऊ शकतो याची जाणीव लोकांना व्‍हायला लागली. सुरक्षेच्‍या दृश्‍‍टीनेही गोवा हे चांगले राज्‍य असून विशेषतः महिलांसाठी हे राज्‍य सुरक्षित आहे. एवढेच नव्‍हे, तर गोव्‍यात वैद्यकीय सुविधाही चांगल्‍या आहेत. यामुळेच देशातील कित्‍येक धनाढ्यांना आणि व्‍यावसायिकांना आपले निवृत्तीचा काळ गोव्‍यात सारणे योग्‍य वाटू लागले आहे.

- चेतन कुंकळयेकर, उपाध्‍यक्ष सेंट्रल पार्क इस्‍टेटस लिमिटेड.

Real Estate Entrepreneur
Margao News: मडगावात थेट सराफ दुकानात घुसली भरधाव कार; तीन दुचाकींनाही उडविले...

कोविडनंतर कित्‍येक लोकांनी गोव्‍यात गुंतवणूक करण्‍यास सुरू केल्‍याने गोव्‍यातील रिअल इस्‍टेट उद्योगाला चांगले दिवस आले आहेत ही गोष्‍ट खरी आहे. विशेषतः उत्तर गोव्‍यात ही मागणी जास्‍त असून लोकांसाठी गोवा हे सेकंद होम डेस्‍टिनेशन ठरले आहे. विशेषत: आलिशान बंगल्‍याच्‍या बाहेरच्‍या लोकांकडून जास्‍त मागणी आहे. लोकांना गोवा आवडू लागला आहे. आणि त्‍यांना गोव्‍यात राहावेसे वाटू लागले आहे ही गोव्‍यासाठी चांगली गोष्‍ट असे म्‍हणावे लागेल.

- डॉ. देश प्रभूदेसाई, रिअल इस्‍टेट उद्योजक व क्रेडाईचे माजी अध्‍यक्ष

Read Goa news in Marathi and Goa local news on Tourism, Business, Politics, Entertainment, Sports and Goa latest news in Marathi on Dainik Gomantak. Get Goa news live updates on the Dainik Gomantak Mobile app for Android and IOS.

दैनिक गोमन्तक आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या घडामोडींसाठी फेसबुक, इन्स्टाग्राम, ट्विटर, शेअर चॅट आणि टेलिग्राम आम्हाला फॉलो करा. तसेच, दैनिक गोमन्तकच्या यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

Related Stories

No stories found.
Dainik Gomantak | दैनिक गोमन्तक
dainikgomantak.esakal.com