Goa: पोलिसांच्या अडचणीत वाढ; स्टेशन डायरीसह हजर होण्याचा आदेश

आत्महत्या पोलिसांच्या (Goa Police) जाचाला कंटाळून नव्हे तर त्यांच्याच कुटुंबियांकडून आलेल्या दबावाखाली केली.
Crime case Goa
Crime case GoaDainik Gomantak
Published on
Updated on

मडगाव: अंबिगेरा या एकाच कुटुंबातील तिघांच्या आत्महत्येच्या घटनेमुळे राज्य हादरले होते. आत्महत्या पोलिसांच्या (Goa Police) जाचाला कंटाळून नव्हे तर त्यांच्याच कुटुंबियांकडून आलेल्या दबावाखाली असल्याचा दावा दक्षिण गोवा पोलिसांनी एका कथित चिठ्ठीच्या आधारे केला होता. मात्र हे प्रकरण आता बाल हक्क रक्षण आयोगाने आपल्या हातात घेतले असल्याने पोलिसांच्या अडचणी वाढल्या आहेत. (Increase in difficulty of Goa police Order to appear with station diary)

Crime case Goa
Goa: 'आत्महत्या केलेले ते तिघे' साक्षर नव्हते, तर चिठ्ठी लिहिणार कसे?

या प्रकरणी तपास अधिकाऱ्याने स्टेशन डायरी घेऊन 9 जुलै रोजी आयोगाच्या कार्यालयात हजर राहावे, अशी नोटीस दक्षिण गोव्याचे पोलिस अधीक्षक पंकजकुमार सिंग यांना पाठविण्यात आली आहे.

त्या मृतदेहांवर अंत्यसंस्कार

‘त्या’ तीन मृतदेहांवर गुरुवारी विजापूर येथे अंत्यसंस्कार करण्यात आल्याची माहिती ‘अर्ज’ या संस्थेचे अरुण पांडे यांनी दिली. या प्रकरणात जमिनीच्या वादातून या तिघांवर दबाव येत होता म्हणून त्यांनी आत्महत्या केली, असा जो आरोप होत आहे त्यासंबंधी पोलिसांनी सखोल चौकशी करण्याची गरज मडगावच्या वन स्टॉप हेल्प केंद्राच्या संचालिका आवदा व्हिएगस यांनी व्यक्त केली आहे.

सीसीटीव्ही फुटेजही सादर करा

या प्रकरणी कंसर्न सिटीझन्स या संघटनेचे रंजन सोलोमन यांनी बाल हक्क रक्षण आयोगाकडे पोलिसांनी त्या अल्पवयीन मुलाला बेकायदेशीररित्या डांबून ठेवले अशी तक्रार केल्यावर आयोगाचे अध्यक्ष पीटर बोर्जीस यांनी कालच त्या मुलाची जबानी नोंदवून घेतली. त्यानंतर पोलिसांना नोटीस पाठविली. पोलिस स्थानकातील त्यावेळचे सीसीटीव्ही फुटेजही आयोगासमोर सादर करा असे या नोटिसीत म्हटले आहे.

Crime case Goa
Goa : 27 वर्षीय कृष्णा तलवारचा वेळसांग समुद्रात बुडून मृत्यू

या प्रश्‍नांची उत्तरे पोलिस देतील का?

  1. दक्षिण गोव्यात आत्महत्येचा प्रकार घडला असताना दक्षिणेतील शवचिकित्सकाची परवानगी न घेता ही शवचिकित्सा गोमेकॉत का केली?

  2. घटनास्थळी आत्महत्या करणाऱ्यांनी लिहिलेली चिठ्ठी सापडली असा पोलिस दावा करतात, तर मृतदेह ताब्यात घेतानाच ती का सापडली नाही? याचाच अर्थ कुठलाही पंचनामा न करताच हे मृतदेह ताब्यात घेतले का?

  3. ही चिठ्ठी मयतांनीच लिहिली या निष्कर्षापर्यत पोलिस कसे पोहोचले? त्यांनी मयतांचे हस्ताक्षर पडताळून पाहिले होते का?

  4. पोलिसांनी मारहाण केली असा गवगवा झाल्यानंतर रात्री उशिरा ही चिठ्ठी कशी काय सापडते? त्या तिघांवर कुटुंबियांकडून दबाव येण्यासारखा कुठला प्रकार घडला होता?

Read Goa news in Marathi and Goa local news on Tourism, Business, Politics, Entertainment, Sports and Goa latest news in Marathi on Dainik Gomantak. Get Goa news live updates on the Dainik Gomantak Mobile app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
var bottom_sticky_ad = googletag .sizeMapping() .addSize([1000, 0], [[728, 90]]) .addSize( [0, 0], [ [320, 50], [300, 50], [320, 100] ] )         .build()
Goa News on Dainik Gomantak
dainikgomantak.esakal.com