Goa : 27 वर्षीय कृष्णा तलवारचा वेळसांग समुद्रात बुडून मृत्यू

समुद्र खवळलेला असल्याने कृष्णा तलवार समुद्राच्या पाण्यात खोलवर ओढला गेला.
समुद्र खवळलेला असल्याने  कृष्णा तलवार समुद्राच्या पाण्यात खोलवर ओढला गेला.
समुद्र खवळलेला असल्याने कृष्णा तलवार समुद्राच्या पाण्यात खोलवर ओढला गेला. Dainik Gomantak
Published on
Updated on

दाबोळी : व्यवसायाने चालक असलेला बोगमाळो येथील रहिवासी 27 वर्षीय कृष्णा तलवार याचा बुधवारी संध्याकाळी वेळसांव समुद्रात बुडून मृत्यू झाला. वेर्णा पोलीस उपनिरीक्षक श्रीधर कामत यांनी दिलेल्या माहितीनुसार मृत कृष्णा तलवार त्याची पत्नी मोनिका तलवार हिच्यासोबत बुधवारी संध्याकाळी 6 वाजण्याच्या सुमारास वेळसांव समुद्रकिनाऱ्यावर गेला होता. मृत कृष्णा तलवार याला कुणीतरी समुद्रात (sea) बुडत असल्याचा जाणवले आणि तो त्याला वाचवण्यासाठी समुद्रात गेला.

समुद्र खवळलेला असल्याने  कृष्णा तलवार समुद्राच्या पाण्यात खोलवर ओढला गेला.
मुंबई गोवा महामार्गावरील धोकादायक रस्त्यांची त्वरीत सुधारणा करा

दरम्यान, समुद्र खवळलेला असल्याने कृष्णा तलवार समुद्राच्या पाण्यात खोलवर ओढला गेला. तिथे उपस्थित असलेल्या स्थानिकांनी कृष्णाला वाचवण्याचा प्रयत्न केला, मात्र त्यांना यश आलं नाही. नंतर मृत कृष्णाचा मोठा भाऊ घटनास्थळी आला आणि त्याने त्याला समुद्रातून बाहेर काढलं आणि त्याला शुद्धिवर आणण्याचा प्रयत्न केला. मात्र वेळ निघून गेली होती, कृष्णा तलवार याला वेळ न दवडता कांसावली प्राथमिक आरोग्य केंद्रात नेण्यात आलं.

समुद्र खवळलेला असल्याने  कृष्णा तलवार समुद्राच्या पाण्यात खोलवर ओढला गेला.
Goa Covid 19: ‘कोविड’च्या मृत्यूदरात देशात गोवा तिसरा

तिथे त्याला डॉक्टरांकडून मृत घोषित करण्यात आलं. मृतदेह शवचिकित्सेसाठी मडगावातील न्यू हॉस्पिसीओ हॉस्पिटलातील शवागृहात पाठवण्यात आला.वेर्णा पोलिसांनी या प्रकरणात सीआरपीसीचे कलम 174 अंतर्गत अनैसर्गिक मृत्यू म्हणून नोंद केली आहे. वेर्णा पोलिस स्थानकाचे उपनिरीक्षक श्रीधर कामत या प्रकरणाचा पुढील तपास करत आहेत.

दैनिक गोमंतकचे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Goa news in Marathi and Goa local news on Tourism, Business, Politics, Entertainment, Sports and Goa latest news in Marathi on Dainik Gomantak. Get Goa news live updates on the Dainik Gomantak Mobile app for Android and IOS.

Related Stories

Karapur One Goa Project Protest
Goa First Alliance 2027
Viresh Borkar RG Goa
Morjai Temple Property Misappropriation
Goa News in Marathi - Dainik Gomantak
dainikgomantak.esakal.com