South Goa District Hospital
South Goa District HospitalDainik Gomantak

गोव्यातील मूत्रपिंड रुग्‍णांची लसीअभावी गैरसोय

रुग्णांना दर दहा दिवसानी बांबोळी येथील गोवा वैद्यकीय महाविद्यालय इस्पितळात जावे लागते.
Published on

सासष्टी: वेपॉक्स लस नागरी आरोग्यकेंद्र किंवा दक्षिण गोवा जिल्हा इस्पितळात उपलब्ध करून देण्याची मागणी डायलिसिसवर असलेल्‍या मूत्रपिंड रुग्‍णांनी केली आहे. ज्या रुग्णांनी ही मागणी केली आहे, ते सध्‍या नावेली आरोग्यकेंद्रामध्ये यावर उपचार घेत आहेत. यापूर्वी ही लस नागरी आरोग्यकेंद्रात उपलब्ध होती. पण गेल्या चार-पाच महिन्यांपासून ती मिळत नाही. त्यामुळे रुग्णांना दर दहा दिवसानी बांबोळी येथील गोवा वैद्यकीय महाविद्यालय इस्पितळात जावे लागते. नावेली आरोग्यकेंद्रात जे रुग्ण उपचार घेत आहेत, ते सामान्य नागरिक असून त्यांना दर दहा दिवसांनी बांबोळीला जाणे परवडत नाही.

South Goa District Hospital
काँग्रेसचे 4 आमदार भाजपच्या संपर्कात

लॉरेल आब्रांचीस या रुग्णाने सांगितले की, वेपॉक्स लस उपलब्‍ध नाहीच, पण आता हिमोग्‍लोबिन वाढविण्यासाठी आणखी एक लस असते, ती पण सध्‍या उपलब्ध नाही. दुसरी गोष्‍ट म्‍हणजे नावेली आणि परिसरात वीजपुरवठा अनियमित असतो. बत्ती केव्‍हा गुल होईल याचा पत्ता नसतो. त्यामुळे रुग्ण भयभीत होतात. नावेली आरोग्‍यकेंद्रात जनरेटर आहे, पण तो सुरू व्हायला वेळ लागतो. जे डायलिसिस रुग्ण आहेत, त्यांची रक्ततपासणी प्रक्रियाही असते. जर ही व्यवस्था येथेच उपलब्‍ध केली तर त्यांचे सुमारे दीड हजार रुपये वाचतील, असेही आब्रांचीस यांनी सांगितले. सरकारने याची गंभीर दखल घेऊन रुग्‍णांना दिलासा द्यावा, अशी मागणी होत आहे.

दैनिक गोमंतकचे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Goa news in Marathi and Goa local news on Tourism, Business, Politics, Entertainment, Sports and Goa latest news in Marathi on Dainik Gomantak. Get Goa news live updates on the Dainik Gomantak Mobile app for Android and IOS.

Goa News in Marathi - Dainik Gomantak
dainikgomantak.esakal.com