Isha Gawas: ..परीक्षा झाल्‍यानंतर भरपूर फिरूया! 'इशा'चे स्वप्न राहिले अधुरे; केळावडे गाव शोकाकुल

Curti Bethora Accident: कुर्टी - बेतोडा बगलमार्गावर काल झालेल्या दोन दुचाकींच्या भीषण अपघातातील दोन्ही मृतांवर शुक्रवारी दुपारी शोकाकूल वातावरणात अंत्यसंस्कार करण्यात आले.
Isha Gawas Bethora Accident
Bethora Accident DeathDainik Gomantak
Published on
Updated on

फोंडा / वाळपई: कुर्टी - बेतोडा बगलमार्गावर काल झालेल्या दोन दुचाकींच्या भीषण अपघातातील दोन्ही मृतांवर शुक्रवारी दुपारी शोकाकूल वातावरणात अंत्यसंस्कार करण्यात आले. इशा गावस हिचे पार्थिव केळावडे येथील निवासस्थानी आणल्यानंतर आईवडिलांनी हंबरडा फोडला. परीक्षा झाल्‍यानंतर भरपूर फिरूया, असे इशाने भावंडांना आश्‍‍वस्‍त केले होते. हे स्‍वप्‍न अधुरे राहिले.

या अपघातात ठार झालेला व अपघातास कारणीभूत असलेला आदित्य देसाई याच्यावर फोंडा पोलिसांनी निष्काळीपणाचा गुन्हा दाखल केला असून त्याच्याविरुद्ध बेदरकार आणि निष्काळजीपणे वाहन चालवल्याप्रकरणी विविध गुन्हे दाखल केले आहेत. त्याच्या मृतदेहावरही आज फोंड्यात अंत्यसंस्कार करण्यात आले.

केरी - सत्तरी येथील पण शिरोड्यातील होमिओपॅथी महाविद्यालयात डॉक्टरीचे शिक्षण घेणाऱ्या इशा गावस हिच्या मृतदेहावर अंत्यसंस्कार करण्यात आले. तिच्या अकाली मृत्यूने संपूर्ण गावावर शोककळा पसरली होती. अनेक मान्यवरांनी तसेच विद्यार्थी, शिक्षक व इतरांनी अंत्यदर्शन घेतले. एकाच्या चुकीमुळे उमद्या व्यक्तिमत्त्वाचा दुर्दैवी अंत झाल्याने सगळीकडे हळहळ व्यक्त करण्यात येत होती.

आनंदात होती इशा

इशाने खूप स्वप्ने पाहिली होती. तिच्या मावस बहिणी, चुलत बहिणी देखील वैद्यकीय क्षेत्रात आहेत. तीसुद्धा डॉक्‍टर होणार असल्‍याचा तिला आनंद होता.

Isha Gawas Bethora Accident
Betoda Accident: बेतोडा जंक्शनवर दोन दुचाकींची समोरासमोर धडक, दोघांचा मृत्यू; रुग्णालयात नेण्याआधीच सोडला प्राण

अपघातानंतर आली जाग; सिग्नल यंत्रणा केली कार्यान्वित

बेतोडा तिठ्यावर सिग्नल यंत्रणा बसवून महिना उलटला, तरी ही यंत्रणा कार्यान्वित झालेली नव्हती. मात्र, काल अपघात होऊन दोघांचा बळी गेल्यानंतर सार्वजनिक बांधकाम खात्याने पोलिसांच्या सहकार्याने ही यंत्रणा सुरू केली. बेतोडा ते कुर्टी व ढवळीपर्यंतच्या बगल मार्गावर आत्तापर्यंत अनेक अपघात झाले असून कित्येकांचे बळी गेले आहेत. या रस्त्याचे योग्य नियोजन केले नसल्याने हे अपघात होत असून बेतोडा तिठ्यावर भुयारीमार्ग उभारावा, अशी मागणी केली जात आहे.

Isha Gawas Bethora Accident
Leopard Accident: .. रात्री स्कुटरला धडकला बिबट्या, गाडी कलंडल्याने विद्यार्थी जखमी; आगरवाडा येथील घटना

आदिती व योगेश यांची प्रकृती स्थिर

या अपघातातील जखमी आदिती मांजरेकर व योगेश पाटील यांची प्रकृती स्थिर आहे. त्यांच्यावर बांबोळी इस्पितळात उपचार सुरू आहेत. शिरोड्यातील कामाक्षी देवी होमिओपॅथी महाविद्यालयात शिक्षण घेणाऱ्या इशा गावस हिच्या निधनाबद्दल या शिक्षण संस्थेचे अध्यक्ष तथा सहकारमंत्री सुभाष शिरोडकर दुःख व्यक्त केले आहे. या कुटुंबाच्या दुःखात आपण सहभागी असल्याचे त्यांनी म्हटले आहे.

दैनिक गोमंतकचे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Goa news in Marathi and Goa local news on Tourism, Business, Politics, Entertainment, Sports and Goa latest news in Marathi on Dainik Gomantak. Get Goa news live updates on the Dainik Gomantak Mobile app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Goa News on Dainik Gomantak
dainikgomantak.esakal.com