Vasco News : वास्‍कोत भुयारीमार्गाचा शुभारंभ; आपत्‍कालीन स्‍थितीत फायदेशीर

Vasco News : नगराध्यक्ष बोरकर यांनी वास्कोचे आमदार कृष्णा साळकर यांनी प्रस्तावित केलेल्या नवीन अंडरपासचे महत्त्व अधोरेखित केले. हा एक अतिशय महत्त्वाचा प्रस्ताव आहे.
Vasco
Vasco Dainik Gomantak

Vasco News :

वास्को, दक्षिण-पश्‍मिच रेल्वेने येथील ‘तानया’ हॉटेलजवळ नवीन भुयारीमार्ग (अंडरपास) बांधण्याचे काम मुरगाव नगरपालिका नगराध्यक्ष गिरीश बोरकर, सामाजिक कार्यकर्ते विशाल नाईक, दक्षिण पश्चिम रेल्वे अधिकाऱ्यांच्या उपस्थितीत सुरू केले.

नगराध्यक्ष बोरकर यांनी वास्कोचे आमदार कृष्णा साळकर यांनी प्रस्तावित केलेल्या नवीन अंडरपासचे महत्त्व अधोरेखित केले. हा एक अतिशय महत्त्वाचा प्रस्ताव आहे. कारण सध्याचा अंडरपास मेस्तावाडा, बेलाबाय, ओरुले आदी भागात जाणाऱ्या अंतर्गत रस्त्यांना जोडतो. तथापि, त्याच्या मर्यादित उंचीमुळे, अग्निशमन दल आणि रुग्णवाहिका यांसारखी आपत्कालीन वाहने येथून जाऊ शकत नाहीत.

Vasco
Goa Crime News : दोन अल्पवयीन मुलींवर गोव्यातील हॉटेलमध्‍ये लैंगिक अत्याचार, एकाला अटक

या भागातील रहिवाशांना दूरच्या दुसऱ्या रस्त्यावरून आपत्कालीन वाहने बोलावावी लागतात. आग लागल्यास किंवा वैद्यकीय आणीबाणीवेळी लागत असलेला अतिरिक्त वेळ प्राणघातक ठरू शकतो. अंडरपासची उंची वाढवून रुंद करण्याचा हा प्रस्ताव वास्कोचे आमदार कृष्णा साळकर यांनी वारंवार केलेल्या पाठपुराव्यानंतर अखेर यशस्वी झाला आहे, असे बोरकर म्हणाले.

Read Goa news in Marathi and Goa local news on Tourism, Business, Politics, Entertainment, Sports and Goa latest news in Marathi on Dainik Gomantak. Get Goa news live updates on the Dainik Gomantak Mobile app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Goa News on Dainik Gomantak
dainikgomantak.esakal.com