Madkai News : मडकईत नवीन रंगमंचाचे उद्‍घाटन

Madkai News : या रंगभूमीवर पारांपई दहाजण समाजातर्फे दरवर्षी पारंपरिक मराठी हौशी नाटके सादर करण्‍यात येतात.
Madkai
MadkaiDainik Gomantak

Madkai News :

मडकई, येथील पारंपई दहाजण समाज व नवप्रणित नाट्‍यसंच मडकईतर्फे नवीन रंगमंचाचे उद्‍घाटन मंगळवारी करण्यात आले. जिल्हा पंचायत व दहाजण समाज पारांपई यांच्या संयुक्तपणे निधीचा वापर करून हा रंगमंच उभारण्यात आला.

या रंगभूमीवर पारांपई दहाजण समाजातर्फे दरवर्षी पारंपरिक मराठी हौशी नाटके सादर करण्‍यात येतात.

यावर्षीही गावातील लोककलाकारांतर्फे दोन दिवस मराठी नाटके सादर करण्यात आली. यात एन दीना दिग्दर्शित सामाजिक नाटक छिन्न व कमलाक्ष खेडेकर दिग्दर्शित वरचा मजला रिकामा ही हौशी नाटकांचा नाट्यप्रयोग सादर करण्यात आला. प्रमुख पाहुणे म्हणून छिन्न नाटकाचे दिग्दर्शक एन. दिना तसेच दहाजण समाजातील ज्येष्ठ नाट्यकलाकार हनुमंत नाईक, विश्‍वनाथनाईक, प्रेमानंद नाईक. प्रभाकर नाईक, प्रकाश नाईक, पांडुरंग नाईक, रंगनाथ नाईक व चंद्रकांत नाईक मान्यवर उपस्थित होते.

Madkai
Goa Crime News : वाडे-दाबोळी लैंगिक अत्याचार प्रकरण ; ‘ती’ वस्‍ती भीतीच्‍या सावटाखाली

प्रमुख पाहुणे व मान्यवरांच्या हस्ते समई प्रज्वलित करून नवीन रंगमचचे उद्‍घाटन करण्यात आले. यावेळी एन. दिना यांनी पारांपई दहाजण समाजाचे कौतुक करण्यात आले. सूत्रसंचालन व आभार राजेश नाईक यांच्यातर्फे करण्यात आले.

यानंतर याच नवीन रंगभूमीवर प्रथम प्रदर्शित होणारे सामाजिक नाटक छिन्‍न या नाटकातील गावातील युवा स्री कलाकार रिया राजेश नाईक व सानवी सुरेश नाईक यांना पारांपई दहाजण समाजातर्फे पुरस्कार देण्यात आले.

Read Goa news in Marathi and Goa local news on Tourism, Business, Politics, Entertainment, Sports and Goa latest news in Marathi on Dainik Gomantak. Get Goa news live updates on the Dainik Gomantak Mobile app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Goa News on Dainik Gomantak
dainikgomantak.esakal.com