Goa Crime News : वाडे-दाबोळी लैंगिक अत्याचार प्रकरण ; ‘ती’ वस्‍ती भीतीच्‍या सावटाखाली

Goa Crime News :जवळच कॉलेज असून यात शेकडो मुली शिकण्यासाठी येतात. या प्रकरणामुळे कॉलेजमध्ये येणाऱ्या मुलींचे पालक धास्तावलेत. त्यांनाही आपल्या मुलांची काळजी वाटू लागली आहे, असे पालकांनी मत व्यक्त केले.
Goa Crime
Goa Crime Dainik Gomantak

Goa Crime News :

वास्‍को, वाडे-दाबोळी येथे पाच वर्षीय मुलीवर लैंगिक अत्याचार करून खून केल्याप्रकरणी त्या भागात भीतीचे सावट पसरले आहे. आज या परिसराची पाहणी केली असता या भागातील स्‍थानिक अजूनही या धक्क्यातून सावरलेले नाहीत, असे दिसते.

जवळच कॉलेज असून यात शेकडो मुली शिकण्यासाठी येतात. या प्रकरणामुळे कॉलेजमध्ये येणाऱ्या मुलींचे पालक धास्तावलेत. त्यांनाही आपल्या मुलांची काळजी वाटू लागली आहे, असे पालकांनी मत व्यक्त केले.

या प्रकरणात ज्‍या दोन आरोपींना बलात्‍कार आणि खुनाच्या आरोपाखाली अटक केली होती, त्‍यांची रवानगी न्‍यायालयीन कोठडीत करण्‍यात आली असून सध्‍या त्‍यांची रवानगी कोलवाळ तुरुंगात करण्यात आली आहे.

सदर प्रकरणानंतर त्या बहुमजली इमारतीचे काम बंद ठेवण्याचा आदेश पोलिसांनी दिला असून त्यानुसार सदर इमारतीचे काम बंद ठेवण्यात आले आहे. तसेच या इमारतीत काम करणारे २० कामगार अजूनही पोलिस चौकशीच्या कचाट्यात आहे. सकाळ ते संध्याकाळपर्यंत पोलिस स्थानकात सदर कामगारांची चौकशी सुरू आहे.

वाडे-दाबोळीतील त्या घटनेला एक आठवडा झाला. त्या घटनेबाबत अजून पोलिस चौकशी सुरू आहे. लैंगिक अत्याचार तसेच खूनप्रकरणी वास्को पोलिसांनी मुरारी कुमार (वय २४) व उपमेश कुमार (वय २२) या दोन नराधमांना अटक केली आहे. वाडे-दाबोळी येथे एका बहुमजली इमारतीचे बांधकाम सुरू असून तिथे पत्र्याने बांधलेल्या तात्पुरत्या खोल्यांमध्ये कामगार राहतात. काही कामगार झारखंड येथील तर काही कामगार बिहार राज्यातील आहेत.

आरोपी अपनेश कुमार व मुरारी कुमार हे मूळ बिहारचे आहे. आरोपी मुरारी हा पेंटर म्हणून तर उपनेश हा गवंडी म्हणून काम करत होता. या दोघांनी दोन दिवसांपूर्वी मुलीच्या आईचे लैंगिक शोषण करण्याचा प्रयत्न केला होता. मुलीच्या लैंगिक अत्याचार व खून प्रकरणी सदर इमारतीत काम करणाऱ्या सर्व कामगारांना वास्को पोलिसांनी ताब्यात घेतले व खाकी वर्दीची चपराक दाखवून आरोपींना बोलते केले आणि त्यांना अटक केली.

Goa Crime
Goa Tourism Department : गोवा पर्यटन विभागाने घडविले ऐतिहासिक, नैसर्गिक गोवा दर्शन

इमारतीचे काम बंद

येथील २० कामगारांची वास्को पोलिस अजून चौकशी करत असून यांच्याकडून याप्रकरणी अजून काही माहिती गोळा करण्याचे प्रयत्न चालू आहेत. त्यासाठी त्यांना दररोज सकाळी वास्को पोलिस स्थानकात बोलावून त्यांची चौकशी केली जाते आणि संध्याकाळी ७ वाजता कामगारांना खोलीवर पाठवण्यात येते.

तसेच या इमारतीचे कंत्राटदार, सुपरवाजर यांच्याकडेही चौकशी चालू आहे. तर सदर इमारतीचे काम बंद ठेवण्याच्या आदेश पोलिसांनी दिला आहे. त्यानुसार सदर इमारतीचे काम बंद आहे.

कामगारांकडे लक्ष द्या!

बांधकाम सुरू असलेल्या कामावर परप्रांतीय कामगार काम करतात. त्यांच्यावर लक्ष नसल्यानेच अनैतिक व्यवहारांना ऊत आला आहे. तसेच इमारत असो किंवा आणखी कुठलेही बांधकाम असो, तेथे काम करणाऱ्या परप्रांतीय कामगार वर्गाची माहिती इमारत मालकांकडून तसेच कंत्राटदारांकडून पोलिसांना पुरवली जात नसल्याने परप्रांतीयांचे आयतेच फावते.

तसेच याविषयी सरकारकडून कोणतेही पाऊल उचलले जात नसल्याने असे प्रकार घडत आहेत,असे स्थानिकांचे मत आहे.

Read Goa news in Marathi and Goa local news on Tourism, Business, Politics, Entertainment, Sports and Goa latest news in Marathi on Dainik Gomantak. Get Goa news live updates on the Dainik Gomantak Mobile app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Goa News on Dainik Gomantak
dainikgomantak.esakal.com