ज्ञान शाखेच्या दृष्टीने अकॅडेमिशियन मोठे योगदान देतात. कोकणीतील संशोधनपर लेखन प्रसिद्ध करायला धाडस हवे व ते भूषण भावे यांनी दाखविले आहे. यामुळे अकॅडेमिशियनविषयी मते बदलली जाऊ शकतात, असे मत लेखक तथा समीक्षक प्रो. डॉ. प्रकाश वजरीकर यांनी येथे व्यक्त केले.
साहित्यिक तथा समीक्षक डॉ. भूषण भावे यांच्या ‘खाण व्यवसायावर आधारित साहित्य : समाजशास्त्रीय समीक्षा’ याविषयावरील कोकणी आणि हिंदी अशा दोन पुस्तकांचे प्रकाशन शुक्रवारी (ता.26) पाटो-पणजी येथील संस्कृती भवनमधील सभागृहात मान्यवरांच्या उपस्थितीत झाले. त्यावेळी प्रमुख वक्ते या नात्याने डॉ. वजरीकर बोलत होते.
साहित्य अभ्यासाला वाव
डॉ. वजरीकर म्हणाले, या पुस्तकात अच्छेव, होमकांड, उद्ध्वस्त, भीष्माचा डोंगर या गोमंतकीय कादंबऱ्यांवर तसेच खाण व्यवसायाशी संबंधित इतर गोव्याबाहेरील कादंबऱ्यांवर समीक्षा आहे. समुद्री साहित्य व गंगा साहित्याच्या अभ्यासाला वाव देणारी ही कादंबरी आहे.
"2008 मध्ये मी खाण व्यवसायात शिरलो. आर्थिक पाठबळ दिसले तेव्हा उमेदवार म्हणून माझ्याकडे लक्ष गेले आणि खाण व्यवसायात गेलो म्हणून आमदार झालो. हा व्यवसाय बंद झाला तेव्हा मशिनरी, ट्रक गेले; पण मला व्यसने नसल्याने तरलो. मी या व्यवसायात प्रलोभनांना बळी पडलो नाही. काही न लपवता आयकर भरला म्हणून सर्वात जास्त आयकर भरणारा आमदार ठरलो."
सुभाष फळदेसाई
दैनिक गोमंतकचे सदस्य व्हा
Read Goa news in Marathi and Goa local news on Tourism, Business, Politics, Entertainment, Sports and Goa latest news in Marathi on Dainik Gomantak. Get Goa news live updates on the Dainik Gomantak Mobile app for Android and IOS.