Bicholim News : घरावर झाड कोसळले; सुदैवाने आईसह मुलगा बचावला

पाच लाखांची हानी : तिखाजन-मये येथील घटना, सरकारकडून भरपाईची मागणी
Bicholim
Bicholim Gomantak Digital Team

तिखाजन-मये येथे लक्ष्मी ठाणेकर यांच्या घरावर शेजारील सावरीचे झाड कोसळून घराची मोठ्या प्रमाणात मोडतोड झाली. ही घटना आज शुक्रवारी मध्यरात्री ३ वाजण्याच्या सुमारास घडली. झाड कोसळले, तेव्हा लक्ष्मी आणि त्यांचा तरुण मुलगा संदेश घरात झोपलेले होते. मात्र, सुदैवाने ते दोघेही बचावले.

पण संदेश याच्या कानाला पत्रा लागल्याने किरकोळ जखम झाली. झाड कोसळल्याने लक्ष्मी यांचे सुमारे पाच लाख रुपयांचे नुकसान झाल्याचा अंदाज आहे. या घटनेची माहिती मिळाल्यानंतर डिचोली अग्निशमन दलाचे अधिकारी शैलेश गावडे यांच्या मार्गदर्शनाखाली दलाच्या जवानांनी घटनास्थळी धाव घेतली. जवानांनी घरावर कोसळलेले झाड कापून बाजूला केले.

Bicholim
G-20 Kashmir: G-20 बैठकीदरम्यान बिलावल भुट्टो झरदारीची PoK वारी, पुन्हा ओकणार गरळ?

या कामी स्थानिक नागरिकांनीही मदत केली. तर पंचायतीच्या तलाठ्यांनी घटनेचा पंचनामा केला. पावसाळा जवळ आला आहे. पावसाच्या तोंडावर घराची मोडतोड झाल्याने आमच्यासमोर मोठे संकट निर्माण झाले आहे, असे लक्ष्मी ठाणेकर यांनी सांगून सरकारने आर्थिक मदत द्यावी, अशी मागणी त्यांनी केली.

Bicholim
Goa Politics : मंत्री, आमदारांमध्ये मतभेद उफाळले; राणे-मायकल आमनेसामने

शौचालयही मोडले

झाड कोसळल्यानंतर घराच्या अर्ध्या भागाच्या छपरासह भिंतींची मोडतोड झाली. नव्यानेच बांधण्यात आलेले स्वच्छतागृहही मोडले. घरातील टिव्ही, फ्रीज आदी सामानाची मोडतोड झाली. या आपत्तीमुळे सुमारे पाच लाख रुपयांचे नुकसान झाले, अशी माहिती संदेश ठाणेकर यांनी दिली.

Read Goa news in Marathi and Goa local news on Tourism, Business, Politics, Entertainment, Sports and Goa latest news in Marathi on Dainik Gomantak. Get Goa news live updates on the Dainik Gomantak Mobile app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Dainik Gomantak | दैनिक गोमन्तक
dainikgomantak.esakal.com